आमच्याविषयी

उस्मानाबाद लाइव्ह हे उस्मानाबादचे पहिले न्यूज पोर्टल आहे.ऑक्टोबर 2010 मध्ये सुरू झालेले उस्मानाबाद लाइव्हचे वाचक केवळ उस्मानाबाद जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र,देश आणि विदेशात आहेत.उस्मानाबाद लाइव्ह या दैनिकाची ही अधिकृत वेबसाईट आहे.त्याचा RNI क्रमांक MAHMAR/2015/61537 असा आहे.
गेल्या 27 वर्षापासून पत्रकारितेत कार्यरत असलेले सुनील ढेपे हे या न्यूज पोर्टलचे मुख्य संपादक आहेत.ढेपे यांना उत्कृष्ट लिखाणाबद्दल राज्य पातळीवरील 15 आणि विभागीय पातळीवरील 12 असे 27 पुरस्कार मिळाले आहेत.
ताज्या बातम्या,सडेतोड अग्रलेख आणि समाजाभिमुख पत्रकारिता हे उस्मानाबाद लाइव्हचे मुख्य वैशिष्ठ आहे.हे न्यूज पोर्टल कोणत्याही पक्षाचे मुखपत्र नाही किंवा कोणत्याही व्यक्तीशी बांधिल नाही. ते फक्त वाचकांशी बांधिल आहे.वाचक हाच आमचा मालक आहे.