मुख्य बातमी 0 Comments 839 Likes       04 Jul 2018

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू

तुळजापूर - तुळजापुरातील  मलबा हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी दाखल केलेल्या नळदुर्गच्या जरीना   फजल शेख या महिलेचा  मृत्यू डॉक्टरांच्या  हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकानी केलाय.

नळदुर्गच्या इंदिरानगरमध्ये राहणाऱ्या जरीना  फजल  शेख (वय 22) या महिलेवर  गेल्या नऊ महिन्यापासून तुळजापूरच्या मलबा हॉस्पिटलमध्ये गरोदरपणाची ट्रिटमेंट  सुरू होती, आठव्या महिन्यात डॉक्टरानी सांगितले की, डिलिव्हरी नॉर्मल होईल, त्यानंतर 14 जून  रोजी जरीनाला पोटात कळा सूरु झाल्यानंतर तिच्या नातेवाईकानी मलबा हॉस्पिटलमध्ये नेले, यावेळी डॉक्टरानी तीन इंजेक्शन देताच, डिलिव्हरी होण्याऐवजी गर्भशयातील  कळा थांबल्या, दुसऱ्या दिवशी डॉक्टरानी सीझर करावे म्हणून सांगितले,त्यामुळे नातेवाईक हादरले आणि नाइलाजाने  संमती दिली,त्यानंतर डॉक्टरानी एका तासात सीझर केले, मुलगाही  झाला पण महिलेची तब्येत खालावली, त्यानंतर डॉक्टरानी उपचारासाठी सोलापूरला हलवण्याचा सल्ला दिला, पहिले सिव्हिलमध्ये नेण्याचे ठरले, पण वाटेत महिलेला झटके सुरू होताच  अश्विनी हॉस्पिटलमध्ये  नेण्यात आले,तिथं तब्बल 16 दिवस ठेवण्यात आले, पण 30 जून रोजी जरीनाचा मृत्यू झाला. पण 54 हजार  बिल भरायला पैसे नव्हते म्हणून एक दिवस प्रेत शवगृहात ठेवण्यात आले, 1जुलै रोजी रात्री प्रेताचे शवविच्छेदन करण्यात आले, 2 जुलै रोजी प्रेत तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आणि मलबा  डॉक्टरावर गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली, दुपारी 2 पासून रात्री उशिरापर्यंत तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ सुरू होता, पोलिसांनी चौकशी करून पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिले, त्यानंतर पहाटे 4 वाजता अंत्यविधी करण्यात आला.

नळदुर्गच्या  जरीना फजल शेख या महिलेच्या मृत्यू प्रकरणी तणाव निर्माण झाल्यानंतर मलबा हॉस्पिटल कालपासून बंद आहे, त्याला कुलूप दिसत आहे. डॉ. नरसिंग मलबा, डॉ सिंधू मलबा, डॉ नीतू मलबा घाबरून गायब झाले आहेत.

Tags :