ब्लॉग 0 Comments 159 Likes       26 Apr 2018

लुटण्याचा धंदा !

शिक्षण संस्था काढून लोकांना लुटण्याचा धंदा काही राजकीय पुढाऱ्यांनी काढला, डीएड, बीएड,पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेज काढून लुटण्यात आले, तो धंदा बसल्यानंतर आता खासगी इंग्रजी शाळेचे पेव फुटले आहे, येथे 25 टक्के जागा गोरगरीबासाठी मोफत प्रवेशाच्या असताना शिक्षण अधिकाऱ्यास हाताशी धरून,फक्त कागदी घोडे नाचवण्यात आले...
सब घोडे बारा टक्के असा अनुभव आला.

हेच राजकीय पुढारी आता खासगी साखर कारखाने काढून शेतकऱ्यांना पिळण्याचा धंदा सुरू केलाय ...
उस्मानाबाद , कळंब आणि इतर तालुक्यातील काही खासगी साखर कारखान्यानी शेतकऱ्यांना चुना लावला.
सहकारी संस्था आणि सहकारी कारखान्यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून हे पुढारी आता खासगी कारखाने काढत आहेत,
त्यांच्या खासगी कारखान्यास विरोध नाही, मात्र त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने कठोर कारवाई होत नाही, ही मोठी खंत आहे...
कायदा लवचिक आहे की सरकार यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई करत नाही ?

उस्मानाबाद आणि कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या काही खासगी साखर कारखाना मालकावर केव्हा कारवाई होणार आहे ?

शेतकरी संघटना काही दिवस आंदोलन करतात, मात्र त्याही शेवटी मॅनेज होतात की काय अशी शंका आहे.

पुढच्या वर्षी ऊसाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. पाऊस चांगला झाल्याने
नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी ऊसाची मोठया प्रमाणात लागवड केली आहे, मात्र त्यांचा ऊस कारखाना नेईल की नाही ही शंका आहे, त्यात तेरणा आणि तुळजाभवानी कारखाना बंद आहे, सरकारने हे दोन्ही कारखाने पुढील वर्षी कसे चालू होतील, याकडे लक्ष देण्याची गरज आहे...

- सुनील ढेपे
9420477111

Tags :