ब्लॉग 0 Comments 129 Likes       02 Jun 2018

कायदा समान आहे ....

तुळजाभवानी मंदिराची ड्रोन कॅमेराने शुटिंग केल्याप्रकरणी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप याच्यासह सहा जणांविरुद्ध अखेर गुन्हा दाखल झाला आहे. आपण जिल्हा माहिती अधिकारी आहोत, वाट्टेल तिथं शूटिंग करू शकतो, ही सानप यांची घमेंड अखेर उतरली आहे.

वास्तविक तुळजाभवानी मंदिर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे, येथील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. या मंदिराची ड्रोन कॅमेराने शूटिंग करण्याची कोणालाही परवानगी नाही. जर करायची असेल तर एसपीचे नाहरकत प्रमाणपत्र आणि जिल्हाधिकारी यांची रीतसर परवानगी लागते, पण हा नियम सानप यांनी तोडला.
त्याचा दलाल आणि मुंबईचे कॅमेरावाले थेट गर्भगृहात शिरले, त्यानंतर त्याच्या दलालांने फेसबुकवर लिहिले, तुळजाभवानी मातेवर शॉर्ट फिल्म येत आहे. वगैरे वगैरे ....
पण ते करण्यासाठी कसलीही परवानगी घेतली गेली नाही. त्यावरच हे थांबले नाहीत, त्यांनी ड्रोन कॅमेराने शुटिंग सुरू केली आणि ते पोलिसांच्या जाळ्यात सापडले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले, दोघे फरार झाले. त्यानंतर सानप तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये टपकला आणि बळीराजा चेतना अभियानची शुटिंग असल्याचे सांगू लागला. जिल्हाधिकारी यांची परवानगी घेतल्याचे त्याने पोलिसांना खोटे सांगितले.
दलाल म्हणतो, शॉर्ट फिल्म आणि सानप म्हणतो बळीराजा चेतना अभियान ....यावरून सानपचा खोटेपणा उघडे पडला, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास तीन दिवस वेळ घेतला, सानपने जिल्हाधिकारी यांची परवानगी बॅकडेटमध्ये काढण्याचा प्रयत्न केला पण त्याचे प्रयत्न असफल झाले. पोलिसांनी अखेर शुक्रवारी सानपसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.यामुळे त्याची घमेंड पुरती उतरली आहे. कायदा सर्वासाठी समान असतो, हे सानप प्रकरणावरून सिद्ध झाले.

सानप याने बळीराजा चेतना अभियानमध्ये लाखो रुपयाचा घपला केला आहे. एका सहकारी महिला कर्मचाऱ्यांस छळलं आहे,पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यास आजपर्यंत पाठीशी घातले आहे.आता तरी सानप याच्यावर कडक कारवाई करावी, त्यास निलंबित करावे,अन्यथा आम्हा पत्रकारास तीव्र आंदोलन छेडावे लागेल.

Tags :