ताज्या बातम्या 0 Comments 623 Likes       23 May 2018

विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी लांबणीवर

उस्मानाबाद - विधान परिषदेच्या उस्मानाबाद, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा निकाल लांबणीवर  टाकण्यात  आला आहे. 24 मे रोजी होणारी मतमोजणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिली .

विधान परिषदेच्या उस्मानाबाद, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक २१ मे रोजी पार पडली होती. त्यात १००५ पैकी १००४ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे आणि भाजप उमेदवार सुरेश धस  यांच्यात चुरशीची लढत झाली होती.

या निवडणुकीची मतमोजणी गुरुवार दि. २४ मे रोजी उस्मानाबादेत होणार होती. मात्र निवडणूक आयोगाने उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना फॅक्स, इमेल पाठवून मतमोजणी पुढे ढकलण्यात आल्याचे कळवले आहे. मतमोजणी पुढे का ढकलण्यात आली, याचे उत्तर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे  यांच्याकडे नव्हते. ते याप्रकरणी पूर्णपणे अनभिज्ञ होते.

मिळलेल्या  माहितीनुसार, बीड नगर परिषदेच्या काकू- नाना आघाडीचे 10 सदस्य अपात्र ठरवण्यात आले होते, त्यांचे मतदान निवडणुकीत ग्राह्य धरायचे की नाही यावरून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यावरून मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे,

आता मतमोजणी केव्हा होणार, हे कोणालाही माहित नाही. त्यामुळे उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.

 

 

Tags :