ताज्या बातम्या 0 Comments 193 Likes       28 May 2018

हरभरा विक्रीसाठी तीन किलोमीटर वाहनांची रांग !!

लोहारा - उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहाऱ्यात नाफेडच्या वतीने हमीभावावर हरभरा खरेदी केला जात आहे, त्यासाठी शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसापासून ठिय्या मांडला असून, वाहनांची तीन ते चार किलोमीटर रांग लागली आहे...

उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात यंदा हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन झालं आहे.या हरभऱ्याची कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडच्या वतीने हमीभावावर हरभरा खरेदी सुरू आहे, त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून वाहनांच्या रांगा सुरू आहेत. सोमवारी ही रांग तीन ते चार किलोमीटर पर्यंत गेली आहे.

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने हरभरा पिकवला असला तरी विक्रीसाठी त्यांची परवड होत आहे. एक तर खरेदी लवकर केली जात नाही आणि झाली तरी किमान दोन महिने हातात पैसे पडत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था आई जेवू देईना, बाप भिक  मागू देईना ! अशी झाली आहे.

Tags :
Related Video