ताज्या बातम्या 0 Comments 348 Likes    रोहीत गुरव यांजकडून    24 Jun 2018

उमरगा तालुक्यात मुसळधार पाऊस

जनजीवन विस्कळीत !

उमरगा - उमरगा शहर आणि तालुक्यात शुक्रवारी रात्री सर्वत्र मुसळधार पाऊस झाला . झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले .
उमरगा शहरासह शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आकाशात काळेकुट्ट ढग जमा होऊन विजेच्या गडगडासह जोराचा पाऊस सुरू झाला . रात्री साडे आड वाजता सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा जोर राञी बारा वाजे पर्यंत कायम होता . झालेल्या जोरदार पावसामुळे येथील राष्ट्रीय महामार्गावरून पाणी वहात होते . वाहणाऱ्या जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे राष्ट्रीय महामार्गा वरील वाहतूक ठप्प झाली होती .
तालुक्यातील उमरगा मंडळात १४६ मी मी तर मुळज कृषि मंडळात १९ दाळींब २४ मुळज १४५ नारंगवाडी ११५ एकूण ९० मी मी पावसाची नोंद झाली आहे . तालुक्यात सरासरीच्या 800 मी मी पैकी आता पर्यत ३२२ मी मी पावसाची नोंद झाली आहे . झालेला पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे . तालुक्यात पेरणीलायक पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीसाठी झुंबड उडाली आहे .
या मुसळधार पावसामुळे उमरगा शहरातीत बँक कॉलनी साने गुरुजी नगर , एकोंडी रोड या भागातील नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले . या भागातील नागरिकांनी शुक्रवारची रात्र जागून काढली '
झालेल्या मुसळधार पावसामुळे पळसगाव येथील पाझर तलाव फुटून परिसरातील २०० शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे .

Tags :