ताज्या बातम्या 0 Comments 1045 Likes       27 Jun 2018

जगदाळेचे पोस्टर फाटले की फाडले ?

नळदुर्ग -येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उद्योजक अशोक जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त अणदूर, चिवरी पाटी येथे लावलेले पोस्टर तथा होर्डिंग्ज मंगळवार दि.२६ रोजी सायंकाळी फाटले आहेत की फाडले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जगदाळे यांचा वाढदिवस २७ जून रोजी आहे. त्यानिमित्त तुळजापूर तालुक्यात अनेक ठिकाणी शुभेच्छा देणारे पोस्टर तथा होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. मंगळवार दि.२६ रोजी राञी ९.३० वाजण्याच्या सुमारास चिवरी पाटी, अणदूर येथील हे पोस्टर फाटल्याचे निदर्शनास आले.
सायंकाळी पाऊस आथवा वादळवारेही सुटले नव्हते यामुळे हे पोस्टर तथा होर्डिंग्ज फाटले की फाडले याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. जगदाळे यांचा नुकताच बीड लातूर उस्मानाबाद या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार असताना व काँग्रेससह राष्ट्रवादीच्या आघाडीचे मतदार जास्त असतानाही पराभव झाला होता.

जगदाळे, फ्लेक्स आणि वाद
'पोस्टर बॉय' अशी प्रतिमा निर्माण झालेले जगदाळे यांची पोस्टरबाजी यापुर्वीही वादग्रस्त ठरली होती. काही दिवसापुर्वी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल याञेची सुरूवात उस्मानाबाद येथून करण्यात आली, यावेळी जगदाळे यांनी उस्मानाबाद शहरातील महत्त्वाच्या चौकात स्वतःचे मोठ्ठे होर्डिंग्ज लावले होते. यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते नाराज झाले व ते कटआऊट राञीतून काढले गेले आणि जगदाळे राष्ट्रवादीच्या ब्लँकलिष्टमध्ये गेले होते. नंतरच्या काळात विधान परिषदेच्या रेसमधून जगदाळेंना डच्चू देऊन ऐनवेळी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यात आली. माञ कराडांनी माघार घेऊन नाट्यमय घडामोडी घडून पुन्हा राष्ट्रवादीस अपक्ष जगदाळेना पुरस्कृत करावे लागले. तरीही जगदाळेंचा पराभव झाला. जगदाळे फ्लेक्स आणि वाद हे समिकरण माञ हल्लाबोल आंदोलनापासून कायम असल्याचे दिसत आहे. तसेच जगदाळे यांच्या काकूचे निधन झाल्यामुळे वाढदिवस साजरा करण्यात येणार नसल्याचे समजते माञ तरीही प्रसिद्धी व जाहिरातबाजीची आवड असलेल्या जगदाळेंनी स्वखार्चाने तालुक्यात अनेक ठिकाणी होर्डिंग्ज लावले आहेत माञ कार्यकर्तेच शुभेच्छा देण्यासाठी फ्लेक्स स्वखर्चाने लावत आहेत असे बोलून जगदाळे वेळ मारत आहेत. एकूणच पोस्टरबाँय, फ्लेक्स आणि वाद याबाबत सर्वञ चवीने चर्चा सुरू आहे.

Tags :