ताज्या बातम्या 0 Comments 467 Likes       28 Jun 2018

ट्रकभर गुटख्याची तंबाखू जप्त

उमरगा   - उमरगा पोलिसांनी गुटख्याच्या तंबाखूवर मोठी कारवाई केली आहे. गुटख्यात मिसळण्यात येणारी तब्बल  32 लाख 40 हजार रुपयांची सुगंधी तंबाखू जप्त केली आहे. त्याचबरोबर  दोघा आरोपींना अटक करून ट्रक ताब्यात घेतला आहे.

हा ट्रक हैद्राबादहून सोलापूरकडे  जात होता. पोलीस निरीक्षक माधव गुंडीले आणि त्यांच्या सहकाऱ्यानी ही कारवाई केली आहे. ही सुगंधी तंबाखू जप्त केल्यानंतर त्याची माहिती अन्न व औषध विभागाच्या सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील यांना देण्यात आली, त्यानंतर पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.  पोलिसांनी ट्रकसह एकूण 37 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Tags :