उस्मानाबाद 0 Comments 306 Likes       29 Mar 2017

बहिणीने मृत्यूच्या दारातून भावाला परत खेचले

वाशी-तालुक्यातील सरमकुंडी येथील गौरी बाळासाहेब गायकवाड (८) या मुलीने मोठ्या भावाच्या अंगावर पडलेली जिवंत विजेची तार प्रसंगावधान दाखवून लाकडाने बाजूला सारून भावाचे प्राण वाचविले. रविवारी (दि.२७) रात्री सातच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये बहीण- भाऊ भाजले असून त्यांच्यावर तत्काळ खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.


गौरी प्रथमेश भास्कर गायकवाड (१०) हे दोघे चुलत बहीण-भाऊ गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडील रस्त्याने घराकडे जात होते. यावेळी विजेचा प्रवाह सुरू असलेली विद्युत तार अचानक प्रथमेशच्या अंगावर पडली. गौरीने क्षणाचाही विलंब करता जवळच पडलेल्या लाकडाने प्रथमेशच्या अंगावरील तार बाजूला करून त्याचे प्राण वाचविले.

यादरम्यान, तार तिच्या अंगावर आल्याने तिच्या चेहऱ्याला इजा झाली. प्रथमेशच्या खांद्याला दुखापत झाली आहे. गावकऱ्यांची वीजप्रवाह बंद करून महावितरण कर्मचाऱ्याला घटनेची माहिती दिली. परंतु कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्याने ग्रामस्थांनी वीज बंद ठेवून महावितरणविरुद्ध संताप व्यक्त केला.

Tags :