उस्मानाबाद 0 Comments 323 Likes       31 Mar 2017

५० वर्षीय शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या

तेर - उस्मानाबाद तालुक्यातील भिकार सारोळा येथील ५० वर्षीय शेतकरी विष पिल्यावर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शेतकरी दादासाहेब संभाजी तनमोर (५०) हे गुरुवारी (दि.३०) सकाळी साडेनऊच्या सुमारास विष प्राषण केले. त्यांना उपचारासाठी तेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी पाचला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्येचे कारण वृत्त लिहिस्तोवर समजू शकले नाही.

Tags :