उस्मानाबाद 0 Comments 256 Likes       31 Mar 2017

पाडव्यालाही गायकवाड आले नाहीत घरी

उमरगा - एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सध्या देशपातळीवर चर्चेत असलेले खासदार प्रा. रवींद्र गायकवाड गुडीपाडव्यासाठी तरी "होम ग्राउंड'वर येतील, असे पसरलेले वृत्त पुन्हा निराधार ठरले. गुढीपाडव्याला नेहमी घरी असणारे, उत्साहात सण साजरा करणारे गायकवाड आज नव्हते. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गुढी उभारली गेली. 

विमानातील मारहाण प्रकरणानंतर खासदार गायकवाड दिल्लीहून परतल्यावर उमरग्यात येतील, असा अंदाज होता. त्यांच्या पुढील भूमिकेविषयी प्रतिक्रिया मिळविण्यासाठी गेल्या तीन-चार दिवसांपासून माध्यमांचे प्रतिनिधी उमरग्यात आहेत. तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुढीपाडव्याच्या सणाला ते निवासस्थानी येतील, असे सांगण्यात येत होते. कामाचा व्याप, संसदेचे सुरू असलेले अधिवेशन आदींमुळे त्यांचा उमरगा दौरा रद्द झाल्याचे आज सांगण्यात आले. 

Tags :