उस्मानाबाद 0 Comments 301 Likes       18 Mar 2017

उघड्यावर शौचास गेल्याने न्यायालयाचा जणांना दंड

कळंब - शहरात उघड्यावर शौचास जाऊन सार्वजनिक ठिकाणी घाण केल्याप्रकरणी पालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने सात जणांना अटक करून न्यायालयासमोर हजर केल्यावर त्यांना प्रत्येकी २०० रुपयांचा दंड ठोठावून समज दिली. ही कारवाई शुक्रवारी (दि.१७) सकाळी करण्यात आली. शहर पाणंदमुक्त करण्यासाठी नगर पालिकेच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी शासन प्रवर्गातील सर्व नागरिकांना अनुदान देत आहे. मात्र याला नागरिक प्रतिसाद देत नसल्यामुळे शहरे पाणंदमुक्तीपासून दूर आहेत. याचाच भाग म्हणून दिनांक १७ मार्च रोजी सकाळी नगर परिषद प्रशासन पोलिस यांनी संयुक्तरित्या कार्यवाही करत शहरातील इंदिरा नगर, शेरी गल्ली, हावरगाव रोड, मारुती मंदिराच्या पाठीमागे, कसबा गल्ली येथे पहाटे फिरून उघड्यावर शौचास जाणाऱ्या जणांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. यावेळी प्रत्येकी २०० रुपयांचा दंड आकारून त्यांना सोडून देण्यात आले. या कारवाईत पालिका कर्मचारी दीपक हारकर, नवनाथ जोगदंड, व्ही. बी. दुरुकर, जे. बी. बावळे, एस. एस. पठाण , बी. बी. दुगाने, बी. बी. राखुंडे , आर. टी. गायकवाड, पोलिस नाईक एच. ए. सिरसट आदींनी सहभाग नोंदविला. यावेळी गणेश चौधरी, जयेश जाधव, अतुल हारकर, विशाल मोरे,हनुमंत कसबे, दादाराव कदम, माणिक खंडागळे यांच्यावर कारवाई करण्यात आली.

Tags :