उस्मानाबाद 0 Comments 271 Likes       02 Apr 2017

विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

तुळजापूर -तालुक्यातीलशिवाजीनगर तांडा, खडकी येथील शेतकरी तुकाराम बाबू चव्हाण (३५) यांचे उपचारादरम्यान सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात शुक्रवारी (दि.३१) रात्री निधन झाले.

चव्हाण यांनी तीन दिवसांपूर्वी कर्जाच्या वसुलीसाठी फायनान्स कंपनी खासगी सावकाराच्या तगाद्याला वैतागून विष प्राशन केले होते. चव्हाण यांच्यावर बँक, सोसायटी, फायनान्स खासगी सावकारांचे मिळून लाखो रुपयांचे कर्ज होते. चव्हाण यांना केवळ दीड एकर शेती असून कर्जापायी गतवर्षी तीन एकर शेती विकली होती. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई- वडील, असा परिवार आहे.

Tags :