उस्मानाबाद 0 Comments 274 Likes       02 Apr 2017

जेवळीत शेतमजुराचे घर जळून खाक

दीड लाखाचे नुकसान

लोहारा - जेवळी येथे शुक्रवारी (दि.३१) पहाटे चारच्या सुमारास विद्युततारेचे घर्षण होऊन लागलेल्या आगीत शेतमजुराचे घर जळून खाक झाले. यामध्ये सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.

शेतमजुराचा संसार उघड्यावर आल्यामुळे शासकीय मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. शिवाप्पा इरेश कोळी अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत गावठाण येथे पत्र्याचे शेड मध्ये वास्तव्यास आहेत. उदरनिर्वाहासाठी ते सालगडी म्हणून काम करतात. शुक्रवारी ते कामावर गेले असता चारच्या सुमारास घराजवळील विद्युत खांबाला तारेचे घर्षण झाले. त्यामधून पडलेल्या ठिणगीने शेजारील सरपण पेटले. थोड्याच वेळात आग पसरून कोळी यांच्या घराला आग लागली. त्यावेळी घरात पत्नी सविता, मुली पार्वती लक्ष्मी झोपल्या होत्या. आगीच्या उष्णतेने त्यांना वेळीच जाग आली. त्या त्वरित घराबाहेर पडल्याने अनर्थ टळला. ओरडाओरड नागरिकांनी केल्यावर आग आटोक्यात आणली.

Tags :