उस्मानाबाद 0 Comments 882 Likes       18 Mar 2017

पीकविम्याच्या मंजुरीत शेतकऱ्यांवर अन्याय

भूम- तालुक्याला दुष्काळी परिस्थीतीचा मोठा फटका बसूनही कवडीमोल पीक विमा मंजूर करून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप असून लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार होत आहे. भूम तालुक्यासाठी कोटी ६० लाख ५८ हजार रुपये पीकविमा मंजूर झाला आहे. ६१ हजार ८७ शेतकऱ्यांनी अापल्या पिकाचा विमा उतरविला होता. गेल्या वर्षी भूम तालुक्यास दुष्काळाचा मोठा फटका बसला होता. यामुळे दोन्ही हंगाम वाया गेले. शेतकरी संकटात सापडला. यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत थोडी अाशा होती . मात्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विमा कंपनीकडून जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा भूम तालुक्यास सर्वात कमी रब्बी हंगामाचा विमा मंजूर केला आहे. गेल्या वर्षी एकट्या भूम तालुक्यात ४२ चारा छावण्यांमध्ये ५० हजार जनावरे जगत होती. एवढी परिस्थिती बिकट असताना रब्बी हंगामाचा विमा कमी मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी भूम तालुक्यातील ६१ हजार ८७ शेतकऱ्यांनी अापल्या शेतातील पिकांचा विमा उतरविला. या विम्यापोटी कोटी ३२ लाख ३१ हजार ५७५ रुपयांचा हप्ता बँकांमध्ये भरला. परंतु, मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही पदरात मात्र तुटपुंजी मदत पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या वर्षीतर अनेक शेतकऱ्यांना २, ३, ५, १०, १५ रुपये अशी विम्याची रक्कम मंजूर झाली होती. या वर्षीही अशीच परिस्थिती दिसून येत आहे. तालुक्यात जिरायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात अासताना विमा कंपनीकङून बागायती क्षेत्रास जास्त अाणेवारी देण्यात अाली, तर जिरायतीसाठी अगदी नगण्य अाणेवारी दिली. विशेष म्हणजे दुष्काळ असूनही बागायती क्षेत्रासाठी विमा मंजूर होतोच कसा,असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला आहे. तालुक्यात ज्वारीची मोठी पेरणी होते. मात्र, बागायतीसाठी मंजुरी दिली. हरभरा पिकाचीही मोठ्या प्रमाणात पेरणी होते. त्यासाठीही कमी आणेवारी मंजूर झाली. यामुळे शेतकऱ्यांकडून विमा कंपनीच्या धोरणाबाबत संताप असून सत्ताधारी विरोधकांबाबत नाराजी आहे.

Tags :