उस्मानाबाद 0 Comments 461 Likes       17 Apr 2017

आरणी येथील नाला सरळीकरण व खोलीकरणाच्या कामाला गती

जलयुक्त शिवार अभियानास सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन

आरणी - उस्मानाबाद तालुक्यातील आरणी येथील सर्व ग्रामस्थांनी गाव व शिवाराला लाभलेल्य भौगोलीक परिस्थितीचा लाभ घेत आपल्या शिवारातील भविष्यात कायम स्वरुपी पाण्याचा प्रश्‍न मिटावा यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाला सरळीकरण व खोलीकरणाच्या कामाला सुरूवात केली आहे. गावकर्‍यांच्या या प्रयत्नाला मदतीसाठी धावून आलेल्या राष्ट्रसंत भैय्युजी महाराज प्रणित श्री सद्गुरू दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट इंदौर (मध्यप्रदेश) यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यरत सुर्योदय परिवाराच्या वतीने हे काम मंगळवार दि. ११ एप्रिल २०१७ सुरू करण्यात आले आहे. या कामाचा आजघडीला एक किलोमिटरचा टप्पा पूर्ण झाला असून हे काम अतिशय वेगाने प्रगतिपथावर असल्याचे दिसून आले.

या कामासाठी आरणीच्या गावकर्‍यांनी लोकवाटा संकलित करुन हे काम साधारण ७ किलोमिटर पर्यंत करणार असून रुंदी जवळपास ३५ फूट असणार आहे. या कामाची खोली नदीचे पूर्वीचे पात्र सोडून १० ते १५ फूट खोली वाढविण्यात येणार आहे. या कामासाठी साधारण १२ ते १३ लाख रुपयांचे फक्त इंधनच लागणार असून त्यासाठी या परिसरातील नागरिकांनी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरवर्ग व सर्वच स्थरातील दानशूर व्यक्तींना सढळ हाताने सहकार्य करुन आपल्या गावाबरोबर या परिसराचा पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी मिटवण्यास हातभार लावावा असे आवाहन मेसाई देवी जलयुक्त शिवार अभियान समितीच्या वतीने अध्यक्ष काशिनाथ भानुदास घुटे, सचिव सुदर्शन शंकर पाटील व सर्व सदस्यांनी केले आहे.

आरणी येथे सुरू झालेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या नाला / नदी सरळीकरण, रुंदीकरण व खोलीेकरणाच्या कामाच्या शुभारंभी प्रसंगी सुर्योदय परिवाराचे कैलास चिनगुंडे, सत्यावान सुरवसे, तुळजापूर, सुधीर अण्णा पाटील, दयानंद मुळे, सिद्रामप्पा खराडे, सुरेश आरबळे, गणेश खराडे, शिवाय ग्रामस्थ सरपंच खंडेराव शिंदे, उपसरपंच अमोल मुळे, कोंडीराम शिंदे, दत्ता शिंदे, काशिनाथ घुटे, फुलचंद साबळे, रावसाहेब घुटे, पोलीस पाटील पेरश शिंदे, विठ्ठल साबळे, लहू गरड, अशोक शिंदे, युवराज गरड, इंजि. आर. एन. शिंदे, नारायण पाटील, दिपक पाटील, नितीन शिंदे, विलास शिंदे, श्रीकांत जाधव, अमोल पाटील, बिभीषण शिंदे, लक्ष्मण पाटील, हानमंत डावकरे, विजयकुमार घुटे, सिध्देश्‍वर कोरके, इश्‍वर घोरपडे, ज्ञानोबा शिंदे, अण्णा घोडके, बापूराव हारकरसह, ग्रामसेवक ऋषिकेश कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी देशमुख, कृषी सहाय्यक मोरे साहेब, तलाठी गायकवाड साहेब, मोठ्या संख्येने ग्रामस्थ व परिसरातील नागरिक व शेतकरी उपस्थित होते.

मागच्या चार-पाच वर्षांपासून सातत्याने घटत चाललेले पर्जन्यमान, असंतुलीत पर्यावरण यामुळे वाढत चाललेला दुष्काळ याला तोंड देण्यासाठी आपण सर्वांनी केवळ सरकारच्या मदतीची अपेक्षा करत बसने चुकिचे ठरणार असून स्वबळावर काहीतरी करुन दाखवण्याच्या जिद्दीन आरणी ग्रामस्थांच्या वतीने उचललेले हे पाऊल अतिशय कौतुकास्पद असल्याचे पंचक्रोषीत बोलले जात आहे.  त्यामुळे अशा या विधायक व समाज हिताच्या कामास सर्वांनी मोकळया मनाने सढळ हाताने मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags :