उस्मानाबाद 0 Comments 339 Likes       18 Aug 2017

भूम पालिकेतील राष्ट्रवादीचे सारे कारभारी भाजपमध्ये

भूम - येथील नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संजय गाढवे यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, १४ नगरसेवक व तालुक्‍यातील आठ सरपंच आणि समर्थकांसह बुधवारी (ता. १६) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजपच्या मुंबईतील कार्यालयात हा प्रवेशाचा सोहळा झाला.

श्री. गाढवे यांच्यासह नगराध्यक्ष सुप्रिया वारे, उपनगराध्यक्ष संयोगिता गाढवे, सर्वच १४  नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत या सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भूमचे विद्यमान नगरसेवक तौफीक कुरेशी, संजय पवार, सादीक मोमीन, आश्रुबा नाईकवाडी, धनंजय मस्कर, संजय देवडीकर, सागर टकले, नगरसेविका मेहराजबेगम सय्यद, अनिता वारे, भागुबाई माळी, सारिका थोरात, करुणा शिंदे, श्रीमती शेंडगे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपला एक सत्ताधारी नगरपालिका मिळाली आहे. दरम्यान, भूम पंचायत समितीचे माजी उपसभापती रामकिसन गव्हाणे, पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर अर्जुन, पाथरुडचे सरपंच बापू तिकटे यांचाही प्रवेशकर्त्यांत समावेश होता.

Tags :