उस्मानाबाद 0 Comments 377 Likes       20 Aug 2017

"खुले वाचनालयास" उतरती कळा

  लोहारा -  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या अमृतमहोत्सव दिनानिमित्त सन 2015 साली सुरु करण्यात आलेल्या "खुले वाचनालयास" उतरती कळा आली आहे. गेल्या वर्षभरापासून विवीध वर्तमान पत्रा अभावी हे वाचनालय शोभेचे व अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेली वास्तू बनली आहे. त्यामुळे या उपक्रमाचा चांगला वापर, उपयोग होईल अशी शहर वाशीयांना अपेक्षा असतानाच राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांना याचा विसर पडला आहे.

      लोहारा शहरातील नगर पंचायत कॉम्प्लेक्स समोरील मोकळ्या जागेत नगर पंचायतच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या अमृतमोहत्सवी दिनाचे ओचित्य साधून मोठा गाजावाजा करत शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सर्वसामान्यांना वर्तमान पत्र वाचायला मिळतील या अपेक्षेने "शरदचंद्रजी पवार खुले" वाचनालय या नावाने माततबर पुढाऱ्यांचे हस्ते दि.12/12/2015 रोजी वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यांनतर कांही महीने नियमित सर्व वर्तमान पत्र वाचकांना वाचण्यासाठी मिळतील यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांनी काळजी घेतली होती. तसेच या उपक्रमाचे नागरिकांनीही कॊतुक केले होते. परंतु नियमित सुरू असलेले खुले वाचनालय हे गेल्या वर्षभरापासून विविध वर्तमानपत्र राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना उपलब्द्ध करुण देण्यास विसर पडल्याने बंद पडले आहे.  या वाचनालयास अतिक्रमनाचा विळखा पडल्याने हे वाचनालय शोभेची वास्तू बनली आहे. शहरातील प्रमुख चोकात असलेले बंद पडके वाचनालयासमोरुनच राष्ट्रवादीचे अनेक माततबर पुढारी ये जा करतात. परंतु त्यांना बंद पडके वाचनालय सुरु करण्यासच वेळ नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मोठा गाजा वाजा करुण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेले वाचनालय हे असून अडचण नसून खोळंबा बनल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी बंद पडलेले वाचनालय त्वरित सुरु करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Tags :