उस्मानाबाद 0 Comments 393 Likes       06 Sep 2017

तुळजापूर मंदिरात महंतांना महिलांनी धरले रोखून

तुळजापूर : तुळजाभवानी मंदिरात नित्य चरणतिर्थासाठी जाताना प्रवेश न दिल्याने संतप्त महिलांनी चरणतीर्थासाठी निघालेल्या महंतानाच काहीवेळ रोखून धरले. हा प्रकार सोमवारी (ता. चार) पहाटे साडेचारच्या सुमारास घडला. 

तुळजाभवानी मंदिरात दररोज पहाटे चरणतीर्थ असते. या चरणतीर्थासाठी दररोज मंहत तुकोजीबुवा येतात. तसेच शहराली अनेक महिलाही येतात. सोमवारी पहाटे नेहमीप्रमाणे चरणतीर्थासाठी महिला मंदिरात आल्या. परंतु सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या महिलांना मंदिरात प्रवेश देण्यास नकार दिला. त्यामुळे महिला संतप्त झाल्या. याचवेळी चरणतिर्थासाठी जाणारे मंहत तुकोजीबुबा यांनाच या संतप्त महिलांनी रोखून धरले. त्यानंतर महंत तुकोजीबुवा यांनी याची माहिती मंदिर प्रशासनाचे सरव्यवस्थापक सुनील पवार यांना कळविल्यानंतर त्यांनी महिलांना नित्य चरणतीर्थासाठी मंदिरात सोडण्यास सांगितले.

पहाटेच्या सुमारास कसलीही गर्दी गर्दी नसतानाही या महिलांना मंदिरात जाण्यास सुरक्षा कर्मचाऱ्याकडून अडविण्यात आल्यामुळे महिला संतप्त झाल्या होत्या. या महिलांना मंदिरात जातेवेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी का अडविले, याचे कारण समजू शकले नाही.

Tags :