उस्मानाबाद 0 Comments 337 Likes       06 Sep 2017

महिलांचा गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभाग

उस्मानाबाद - कसबेतडवळे येथे अंबिका गणेश मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये महिलांनी प्रत्यक्षात सहभाग घेतल्याने मिरवणुकीला एक आगळी वेगळीच शोभा आली असून पहिल्यांदाच महिलांनी गणपती मिरवणुकीत उत्स्फुर्त सहभाग घेतला आहे.

कसबेतडवळे येथील अंबिका गणेश मंडळ यावर्षी रौप्य मोहत्यव साजरा करत असुन त्यांनी या वर्षी एका आगळ्या वेगळ्या मिरवणुकीचे आयोजन केले आहे. डॉल्बी, बँड यांना व्यर्थ पैसा न खर्च करता त्यांनी मिरवणूक काढली आहे. मिरवणुकीसाठी मंडळाच्या तरुणांनी विशेष असे नाशिक ढोल पथक तयार केले होते. याची गेल्या पंधरा दिवसांपासून तयारी करण्यात येत होती. ते पथक आज मिरवणुकीमध्ये गणरायाच्या पुढे होते, तर न वारकऱ्यांचे पथक ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम असा ताळमृदंगाच्या गजरात नाम जप करत होते व सगळ्या महत्त्वपूर्ण म्हणजे पहिल्यांदाच पारंपारीक वेशभूषा परिधान केलेल्या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. यामुळे या मिरवणुकीला एक आगळे वेगळे रुप आले होते 

गणेशोत्यव मिरवणुक म्हणले की डॉल्बी बँन्ड यांचा कर्णकर्कश आवाज त्यात बेधुंद होऊन नाचणारे तरुण व यामुळे होणारा गोंधळ व पैशाची नासाडी होते. या सर्व बाबीना  महीलांच्या सहभागामुळे पायबंद झाला असून, अंबिका गणेश मंडळाने राबवलेला आगळा वेगळा प्रयोग खरोखरच अनुकरणीय आहे.

Tags :