उस्मानाबाद 0 Comments 488 Likes       08 Sep 2017

औरंगाबाद विद्यापीठ अंतर्गत खो-खो स्पर्धेकडे असंख्य महाविद्यालयांनी फिरवली पाठ

नळदुर्ग - (ता.तुळजापूर) -येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा  विद्यापीठ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानात अंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धा सुरू झाल्या त्याचे उद्घाटनही मोठ्या थाटात पार पडले मात्र या स्पर्धेसाठी मुलींचे ९ संघ तर मुलाचे अवघे १४ असे एकूण २३ संघच या सहभागी झाले आहेत. यापैकी बहुतांशी संघ हे उस्मानाबाद जिल्ह्यातील असल्यामुळे  विद्यापीठ अंतर्गत असलेल्या सुमारे साडेचारशे महाविद्यालय पैकी फक्त मोजक्याच संघाने सहभाग नोंदविल्यामुळे खेळाडूंनी व महाविद्यालयांनी या स्पर्धेकडे पाठ फिरवल्याचे आढळून येत आहे. माञ स्पर्धा सुरू असलेल्या नळदुर्गच्या महाविद्यालयाने या स्पर्धेसाठी (मुलांचे २५ व मुलींचे २०) असे सुमारे  ४५ संघ येणार असल्याचे सांगितले होते माञ प्रत्यक्षात आनेक महाविद्यालयांनी स्पर्धेकडे पाठ फिरवली.

      यावेळी मुलीचे संघ कोणत्या महाविद्यालयाचे व कुठल्या शहरातील आहेत याबद्दल माहिती विचारली असता आयोजकांनी नऊ महाविद्यालय ऐवजी अकरा महाविद्यालयांची नावे सांगितली यापैकी लेट. लक्ष्मीबाई विद्यालय कोणत्या गावचे आहे हे विचारल्यानंतर  मात्र ते माहित  नाही असे उत्तर मिळाले. यावरून स्पर्धेस उपस्थित संघ खरंच किती आहेत असा प्रश्न निर्माण होत आहे.

Tags :