उस्मानाबाद 0 Comments 324 Likes       12 Sep 2017

शाळेच्या इमारतीची एक खोली कोसळली; जीवितहानी नाही

नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) : गंधोरा (ता. तुळजापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीची एक वर्गखोली आज (सोमवार) कोसळली. शाळा मंदिरात भरत असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

या शाळेचे बांधकाम सन १९७४ ते सन १९९५ या कालावधीत झाले होते. काही बांधकाम दगडाचे आहे व काही बांधकाम सिमेंट काँक्रेटचे आहे. शाळेत एकूण नऊ खोल्या असून, ऑगस्ट २०१४ मध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेची इमारत जिर्ण आहे, जागोजागी गळती लागली असून इमारत वापरण्या योग्य नसल्याचा अहवाल शिक्षण आधिक-यांना पाठवला होता. मात्र, शाळेची नवी इमारत बांधण्यासाठी जुनी इमारत पाडण्याची परवानगी जिल्हा परिषदेने दिली नाही.

सुदैवाने मागील दोन महिन्यांपासून शाळा विठ्ठल मंदिरातील सभागृहात भरत आहे. इमारत धोकादायक असल्याचा ठराव शालेय शिक्षण समितीने घेऊन मार्च २०१५ मध्ये गट शिक्षण अधिकारी यांना पाठवला होता. त्यावरून सात जुन २०१७ रोजी चार वर्ग खोल्या बांधण्यास मंजुरी  मिळाली होती. पहिली ते सातवीपर्यंत ही शाळा असून विद्यार्थी संख्या १४७ आहे. माञ सध्या शाळेला जागा आहे.

Tags :