उस्मानाबाद 0 Comments 298 Likes       14 Sep 2017

दुधीतील मंदिर पाडल्याने मारुती आणि विठ्ठल - रुक्मिणीची मूर्ती भरपावसात उघड्यावर

साडेचार महिने झाले तरी कामास मुहूर्त लागेना !

परंडा - परंडा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर बार्शी रोडवर सहाशे लोकवस्तीचे दुधी गाव आहे, या गावात पुरातन मारुती आणि विठ्ठल - रुक्मिणी मंदिर होते, ते दुधीकरांचे कुलदैवत आहे.

या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची इच्छा स्थानिक भाजप कार्यकर्त्यांची झाली, त्यांनी विधान परिषद आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी भेट घेतली, ठाकूर यांनी पाच लाख रुपये निधी देण्याचे मान्य केले,
लगेच भाजप कार्यकर्त्यांनी जेसीबी मशीन आणून मंदिर उध्वस्त केले, यासाठी ग्राम सभेचा ठराव नाही, बर मंदिर पाडले ते पाडले साडेचार महिने झाले अजून कामाचा पत्ता नाही, निधीचा पत्ता नाही ...

आहे ते मंदिर पडल्यामुळे बिचारे मारुती आणि विठ्ठल - रुक्मिणी मूर्ती भर पावसात उघड्यावर यातना सहन करीत आहेत, यामुळे ग्रामस्थांत चीड व्यक्त केली जात आहे,

मंदिर पाडण्यासाठी प्रशासनाची कसलीही पूर्व परवानगी घेतली नाही, नव्या मंदिर बांधकामाचा अजून आराखडा नाही, भाजप कार्यकर्त्यानी सरपंचांच्या संगनमताने फालतू उद्योग केला आहे,
आमदार सुजितसिंह ठाकूर याप्रकरणी लक्ष घालणार का ? याकडे दुधी ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे ...

Tags :