उस्मानाबाद 0 Comments 253 Likes       23 Jan 2018

अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन

.कळंब- नायगांव (पा) ता.कळंब येथे जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते गावातील विविध विकास कामांचे शुभारंभ व  नवीन विकास  कामांचे भूमिपूजन करण्यात आले. नागरिकांना शुद्ध व थंड पिण्याचे पाणी मिळावे यासाठी १४ च्या वित्त आयोगातून रु. ६.५० लक्ष किमतीच्या पाणी शुद्धीकरण मशीनचे, १४ व्या वित्त आयोगातूनच रु. ३.०० लक्ष खर्चून गावातील व्यापारी संकुलाची दुरुस्तीच्या कामाचे, रु.१.५० लक्ष खर्चून महिलांसाठीच्या सार्वजनिक प्रवासी निवारा तसेच जि.प.उस्मानाबाद अंतर्गत दलित वस्ती निधीमधून रु. ५ लक्ष खर्चून बनवण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याचे कामांचे लोकार्पण जि.प.उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

जि.प.निधीमधून शाळेस संरक्षण भिंत बांधण्याचे काम अंदाजे खर्च रु.२.६५ लक्ष, जि.प.निधीतूनच शाळेच्या खोल्या दुरुस्तीचे काम अंदाजे खर्च रु. २ लक्ष, तसेच १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पूर्ण होणाऱ्या समाज मंदीराच्या संरक्षण भिंतीच्या कामाचे जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले.

या कार्यक्रमास पंचायत समिती, कळंब सभापती दत्तात्रय साळुंके, जि.प.सदस्या सौ.रत्नमाला टेकाळे, सरपंच सौ.वनमाला पाटील, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन पंडितराव टेकाळे, राजाभाऊ पाटील, भरतराव पाटील, विक्रम पाटील, संगपाल साखळे, बाळासाहेब शितोळे, अनिल माळी, सुधाकर शितोळे, प्रल्हाद शितोळे, बापू गायकवाड, भरत गरड यांच्यासह गावातील राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

मकर संक्रातीच्या निमित्ताने जि.प.उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांनी गावातील महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास देखील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.     

Tags :