उस्मानाबाद 0 Comments 231 Likes       28 Jan 2018

अणदूरमधील आठवडी बाजाराची जागा बदलण्याचा कुटील डाव !

अणदूर -तुळजापूर तालुक्यातील अणदूर गावात दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो, हा बाजार गेल्या 40 वर्षांपासून ग्रामपंचायतच्या आजूबाजूला भरत असताना, त्याची जागा बदलण्याचा कुटील डाव सध्या शिजत आहे.
अणदूर हे 20 हजार लोकसंख्या असलेले गाव असून, आजूबाजूला अनेक खेडी आहेत, येथे दर गुरुवारी आठवडी बाजार गेल्या 40 वर्षांपासून ग्रामपंचायतच्या पाठीमागे आणि बाजूला असलेल्या राईस मिलच्या समोर भरत आहे.मात्र एका बड्या राजकीय पुढाऱ्यास या आठवडी बाजारचा त्रास होत असल्याने या बाजाराची जागा बदलण्याचा कुटील डाव सध्या शिजत आहे.
वास्तविक सध्याची जागा योग्य असताना, केवळ त्रास होत आहे म्हणून लोकांना त्रास देण्याचा उद्योग सुरू आहे.
हा बाजार पुजारी गल्लीमध्ये भरवण्याचा घाट घातला जात आहे. पुजारी गल्लीमध्येच श्री खंडोबा मंदिर आहे, येथे असंख्य भाविक येत असतात, भाविकांना त्रास झाला तरी चालेल पण आपणास नको, अशी आडेलतट्टू भूमिका "मालक" नावाच्या पुढाऱ्याने घेतली आहे.
वास्तविक पुजारी गल्लीतीलच महिला सरपंच आहे, तिचे पती माजी पंचायत समिती सभापती आहेत, पाहुण्यांच्या हस्ते साप मारण्याचा डाव आखण्यात आला आहे.
आठवडी बाजार पुजारी गल्लीत भरणार असल्याची दंवडी ऐकताच, या गल्लीत राहणाऱ्या तरुणांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.हा संताप पाहून, सरपंच पतीने सारवासारव सुरू केली आहे, आण्णा चौक ते सरळ धनगर गल्ली पर्यंत हा बाजार भरवण्यात येईल, असे सांगितले जात आहे, मात्र स्थानिक दुकानदार त्यास तयार नाहीत.
आठवडी बाजाराची जागा बदलण्यावरून अणदूरमध्ये राजकीत घमासान सुरू आहे. केवळ एका पुढाऱ्यासाठी संबंध गावाला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आंदोलन छेडणार !

अणदूरमधील आठवडी बाजाराची जागा आहे, आहे त्या ठिकाणी ठेवावी, ती बदलली तर तीव्र आंदोलन छेडावे लागेल.
केवळ एका पुढाऱ्यासाठी संबंध गावाला वेठीस धरणे निंदाजनक आणि संतापजनक आहे.
आठवडी बाजाराची जागा बदलली तर लोकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करावे लागेल .

- सुनील ढेपे

Tags :