उस्मानाबाद 0 Comments 324 Likes       31 Jan 2018

तरुण शेतकऱ्याने पपई ची लागवड करून घेतले लाखोंचे उत्पादन

मुरूम - उमरगा तालुक्यातील मुरूम येथील शेतकरी मनोज स्वामी यांनी दुष्काळी परिस्थितीत ही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या शेतात पपई ची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पादन घेऊन युवा शेतकऱ्यां समोर आदर्श घालूल दिला आहे .
उस्मानाबाद जिल्हा हा दुष्काळी, अवर्षणग्रस्त म्हणून ओळखला जातो . त्यातच उमरगा तालुक्यात मोठ्या नद्या वाहत नसल्याने तालुक्यतील विहिरी व बोर ना जेमतेमच पाणी .येथील शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच आपली शेती करावी लागते . निसर्गाचा लहरीपणा आणि सततच्या नैसर्गिक आपत्तीने शेती व्यवसाय कोलमडून पडला . या सर्वांवर मात करत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर उमरगा तालुक्यातील मुरूम येथील तरुण शेतकरी मनोज स्वामी यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये विहीर असताना शेतीला पाणी कमी पडत असल्याने बोर घेतले .बोरला पण जेमतेमच पाणी लागल्याने खचून न जाता जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ऊसा सारख्या परंपारीक पिकाला बगल देत ठिबक सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी आपल्या शेतात आज पर्यंत केळी , मिरची , कलिंगड आदी पिकांची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पादन घेतले आहे .गेल्या वर्षी त्यांनी आपल्या शेतात अडीच एकर क्षेत्रावर कलिंगड लागवड करून साठ दिवसात उत्पादन खर्च वजा जाता तीन लाख रुपयांचा नफा मिळवला या वर्षी पाच एकर क्षेत्रावर कलिंगड तर तीन एकर क्षेत्रावर पपई ची लागवड केली आहे . आतापर्यंत साडेचार लाख रुपयाची पपई ची विक्री केली असून आणखीन चार लाख रुपयाच्या जवळपास उत्पादन अपेक्षित आहे .शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून घेऊन त्या आधारे नवनवीन बियाणे , विविध फळ पिकांची लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यात ते नेहमी अग्रेसर असतात याच बरोबर सोशल मीडियातून शेती बाबत युवा शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती देऊन मार्गदर्शन करत असतात

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापर काळाची गरज

शेतकऱ्याकडे कमी प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने पाण्याचे योग्य नियोजन गरजेचे आहे .ठिबक सारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग करत दुग्ध व्यवसाय सारख्या जोड धंद्याची सांगड घालत शेती करणे काळाची गरज आहे . त्याच बरोबर बाजारपेठेचा अंदाज घेत विविध फळ पिकांची लागवड करून विक्रमी उत्पादन घेत शेतकऱ्यांनी आपली आर्थिक बाजू सक्षम करावी
- मनोज स्वामी , शेतकरी मुरूम

Tags :