उस्मानाबाद 0 Comments 234 Likes       31 Jan 2018

"राष्ट्रवादी आपल्या दारी" अभियानास कळंब शहरात सुरुवात

  कळंब - शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियान राबविण्यात येत असून दि.२९ जानेवारी रोजी प्रभाग क्रमांक ८ मधील बाजार समिती येथील फरशी कारखाना भागात आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनि बैठक घेऊन अभियानाचा शुभारंभ केला.

            आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्या संकल्पेनेतून हे अभियान राबविण्यात येत आहे. शहरातील प्रभाग ८ मध्ये आयोजित केलेल्या बैठकीत बोलताना त्यांनी यामध्ये प्रामुख्याने जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पूर्वसूचना देऊन किमान प्रत्येक प्रभागात बैठकांचे आयोजन करण्यात येणार असून गरजेनुसार व प्रभागाच्या व्याप्तीनुसार बैठकांची संख्या वाढविण्यात येणार आहे. यात प्रत्येक प्रभागातील सार्वजनिक समस्या जसे कि पाण्याची अडचण, रस्ते, नाली, दिवाबत्ती, कचरा, शाळा, ड्रेनेज लाईन, सार्वजनिक शौचालय, स्वच्छतागृह, आधारकार्ड,जेष्ठ नागरिक ओळखपत्र, पेन्शन, वैद्यकीय अर्थसहाय्य, शैक्षणिक सवलती, शासकीय योजनांचा लाभ याबाबत लिखित स्वरूपात अर्ज मागवून त्यावर उचित कारवाईसाठी संबंधित विभागाकडे पाठवण्यात येईल व तो प्रश्न मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे सांगितले.

            या बैठकीतच या अभियानाविषयी भूमिका मांडताना आ.पाटील यांनी नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, इतर शासकीय विभागातील कामे व मंत्रालय स्तरावर जर कांही समस्या किंवा प्रलंबित कामे असतील तर त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल व त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी माहिती दिली.

            बैठकीस महिला व पुरुषांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत आपापल्या समस्यां मांडल्या. सदर अडचणी सोडविण्यासाठी नगर परिषदेचे पदाधिकारी व कर्मचारी यांना जीम्मेदारी ठरवून देऊन कालबद्ध कार्यक्रम आखण्याच्या सूचना दिल्या व या सर्व समस्या सोडविण्यासाठी नगर परिषद पदाधिकारी, नगरसेवक, पक्षाचे नेते, कार्यकर्ते सर्वोतोपरी सहकार्य करतील अशी ग्वाही त्यांनी उपस्थित नागरिकांना दिली.

            सदर अभियान जिल्हाभर घेण्यात येणार असून विकासकामाबाबत कांही सूचना तसेच स्थानिक स्तरासह, केंद्र व राज्यपातळीवरील समस्या सोडविण्यासाठी शहरवासीयांनी या अभियानात सहभाग घ्यावा असे आवाहन आ.पाटील यांनी याप्रसंगी केले.

            बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर अध्यक्ष- सौ. सुवर्णा मुंढे, उपाध्यक्ष- संजय मुंदडा, गटनेते- श्रीधर भवर, नगरसेवक साधना बागरेचा, छाया अष्टेकर, सरला सरवदे, सुभाष पवार, इंदुताई हौसलमल, लक्षमण कापसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबुराव खोसे, कांतीलाल बागरेचा, सागर मुंढे, मंगेश अष्टेकर, अजय सरवदे, अनिल करंजकर, शोभा ठाकूर, रुक्साना बागवान, अशोक चोंदे व शेकडो महिला, पुरुष, युवक उपस्थित होते.

 

Tags :