उस्मानाबाद 0 Comments 249 Likes       23 Mar 2018

कर्जबाजाराला कंटाळून शेतकऱ्याने संपवले जीवन !

आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवली चिठ्ठी

मुरूम - उमरगा तालुक्यातील मुरूम येथील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते संभाजी खंडागळे हे आपल्या आयुष्यात कसल्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता इतरांच्या मदतीसाठी नेहमी पुढाकार घ्यायचे, आपल्या स्पष्ट आणि निर्भीड बोलणीतून व्यवस्थेविरुद्ध लढा द्यायचे ,काय कमावले तर माणुसकी कमावलं ! आणि व्यवस्थेला झुकवल असे ठासून सांगायचे, लोकांच्या प्रत्येक कामासाठी प्रशासनाला झुकवणारा हा शेतकरी आजच्या व्यवस्थेच्या उदासीन कारभारामुळे आणि समाजाच्या असहकार्यामुळे आपल्यावर बेतलेली आर्थिक समस्या सोडवण्यात हतबल झाला अन अखेर आपल्या आयुष्यासमोर गुडघे टेकवत गळफास घेवून जीवन सम्पवले ते आत्महत्या करण्यापूर्वी आर्थिक परिस्थितीमुळेच जीवनाचा प्रवास सम्पवत असून यापुढेतरी सरकार आणि समाज जागे व्हा अशी विनंती लिहलेल्या चिठ्ठीत केली आहेत

गुरुवारी (दि.२२) रात्री आठच्या सुमारास राहत्या घरी त्यांनी गळफास घेवून जीवन यात्रा सम्पवली आहेत त्यांच्याकडून असे कृत्य होईल हे सुरुवातीला कुणालाच खरे वाटले नाहीशेती ,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सतत पुढे राहून समाजसेवा करत असलेलेसंभाजी खंडागळे हे आत्महत्या केले याचे मुख्य कारण सरकारची उदासीन सरकारी व्यवस्थाच जबाबदार असल्याचे त्यांनी लिहलेल्या चिट्टीतून स्पष्ट होते गेल्या अनेक दिवसांपासून कर्ज झाल्याने हलाखीचे जीवन ते जगत होते .आर्थिक परिस्थितीमुळे एकुलत्या एक मुलाचा शैक्षणिक खर्च आणि घर खर्च जिकिरीचे झाले होते .तसेच साठवण तलावासाठी शासनाने जमीन संपादित केली मात्र तुटपुंजे मावेजा दिल्यामुळे त्याबद्दल न्यायालयात दाद मागितली मात्र न्यायालयीन दिरंगाईमुळे जमिनीची मोबदला पदरात पडले नाही ,बँकेचे कर्ज डोक्यावर झाल्याने त्या चिंतेत होतो सरकारने कर्जमाफीची घोषणा केली मात्र ती नावालाच राहिली बँकेत इतर आर्थिक व्यवहार देखील करता येत नव्हती मित्रपरिवरकडून उसने घेतलेले रक्कम द्यायचे कसे या चिंतेत होतो माझा सहकार्यासाठी कोणी पुढे आले नाहीत सरकारने यापुढे शेतकऱ्याबद्दल तात्काळ निर्णय घेवून प्रत्यक्ष काम करायला पाहिजे अशी विनंती करतो आणि माझ्या कुटुंबाला मदत करा अश्याप्रकारची विनंती त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिट्टीत लिहून केली आहेत त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. शुक्रवारी (दि.२३) सकाळी अकराच्या सुमारास मुरूम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले .या प्रसंगी नातेवाईकासह सामाजिक, राजकीय तसेच मित्र परिवारातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags :