उस्मानाबाद 0 Comments 221 Likes       23 Mar 2018

शेतकऱ्याच्या हातावर तुरी देत मृत्यूने कवटाळले !

लोहारा - शेतकऱ्याचे नशीबच फुटके आहे.आपल्या शेतात पिकवलेली तूर घेवून हमीभाव केंद्रावर सकाळपासून तिष्ठत उभारलेल्या शेतकऱ्याचा अचानक चक्कर येवून पडल्याने मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना लोहारा (जि. उस्मानाबाद) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुकानाजवळ घडली आहे.

लोहारा तालुक्यातील करवंजी येथील शेतकरी रावसाहेब शिवराम हाके( वय 65 वर्षे) यांना करवंजी शिवारात तीन एकर शेती आहे. या शेतात पिकवलेली तुरी लोहारा येथील हमी भाव केंद्रावर गुरूवारी सकाळी 8:00 वाजता विक्रीसाठी आले होते. तुरी विक्रीसाठी वेळ लागल्याने प्रतिक्षा करीत ते दिवसभर लोहारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत दुकान आवारातच होते. रात्री 7:30 वाजता अचानक चक्कर येवून खाली कोसळले. त्यांना उपचारासाठी लोहारा ग्रामीण रूग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषीत केले.

शेतकरी रावसाहेब शिवराम हाके यांची मृत्यु उष्माघाताने झाला की इतर कारणाने झाला ? याविषयी तर्क वितर्क लावले जात आहेत.मात्र शेतकऱ्याच्या हातावर तुरी देवून मृत्यूने कवटाळने हळहळ व्यक्त केली जात आहे..

Tags :