उस्मानाबाद 0 Comments 187 Likes       24 Apr 2018

'वंशाला दिवा' हवा म्हणून शिक्षकाने केले दुसरे लग्न

उस्मानाबाद - 'वंशाला दिवा' हवा म्हणून तेरखेडा ता. वाशी, जि. उस्मानाबाद येथील एका 46 वर्षीय शिक्षकांने पहिली पत्नी आणि 14 वर्षांची मुलगी असताना पिंपरी चिंचवडच्या एका 19 वर्षीय मुलीबरोबर दुसरे लग्न केले, पण सासरचे वातावरण पाहून दुसऱ्या पत्नीने आपल्या आई वडिलांनी इच्छेविरुद्ध लग्न केले म्हणून पोलीस स्टेशन गाठले. त्यामुळे हा शिक्षक गोत्यात आला आहे.

 

उत्तम काळे असे या शिक्षकाचे नाव आहे.दुसरे लग्न करताना त्याने पहिल्या पत्नीची संमती घेतली होती, दुसऱ्या पत्नीच्या आईवडीलास पैश्याचे आमिष दाखवून काळेचे ज्ञानेश्वर माऊलीच्या आळंदीत 'उत्तम' लग्नही पार पडले होते, पण दुसऱ्या पत्नीने आपल्या इच्छेविरुद्ध लग्न केले म्हणून पोलीस स्टेशन गाठल्याने त्यांना 'काळे' तोंड करावे लागत आहे.

 

येरमाळा पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही म्हणून दुसऱ्या पत्नीने पिंपरी चिंचवड गाठून तक्रार दिली, त्यानंतर चौकशीसाठी येथील पोलीस तेरखेड्यात दाखल झाले आहेत, त्यामुळे उत्तम काळेच्या पायाखाली फटाके उडाले आहेत.पोलीस पुढे काय कारवाई करतात, याकडे लक्ष वेधले आहे.

Tags :