उस्मानाबाद 0 Comments 240 Likes       17 Mar 2017

अठरा शिक्षकांच्या खात्यावर भाग भांडवल जमा

उमरगा - तालुका शिक्षक व सेवकांची पतसंस्थेत सभासदाना कोणत्याही प्रकारची सूचना अथवा नोटीस न देता अठरा शिक्षकांच्या खात्यावर भाग भांडवल (शेअर्स) जमा केले आहेत. याबाबतची माहिती अशी की,तालुक्यात माध्यमिक व प्राथमिक शिक्षक-सेवकांची दोन पतसंस्था आहेत. प्राथमिक शिक्षक व सेवकांची पतसंस्था हि नेहमीच चर्चेत रहाते. पतसंस्थेच्या नुकत्याच मार्च महिन्यात झालेल्या मासिक बैठकीत १८ शिक्षक सभासदाना गेल्या अनेक महिन्यापासून कसली हि नोटीस न देता कोणत्याही प्रकारचे कारण नसताना त्यांचे भाग भांडवल परस्पर खात्यावर जमा करून मनमानी कारभार सुरु केला आहे. संबंधित शिक्षक सभासद यांनी पैशाची खात्री केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असुन संचालक मंडळ सभासदाना विश्वासात न घेता नियमबाह्य कारभार सुरू केला असुन या प्रकारचे कार्य करून आम्हा १८ शिक्षक सभासदांचे सदस्यत्व रद्द करण्याचा संचालक मंडळाचा डाव असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. पतसंस्थेत होत असलेल्या मनमानी कारभाराबाबतची चौकशी करुन कार्यवाही करावी व सभासदांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शिक्षक सभासद राहुल सूर्यवंशी, विजय ओवांडकर व बालाजी मसलगे यांनी निबंधक कार्यालयाचे सहाय्यक निबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Tags :