उस्मानाबाद 0 Comments 1093 Likes       26 May 2018

सचिन जगताप यास जामीन मंजूर

उस्मानाबाद - स्त्रीलंपट सचिन जगताप याची तीन दिवसाची पोलीस कोठडी शनिवारी संपताच पोलिसांनी त्यास न्यायालयात उभे केले असता, १५ हजार  जात मुचलक्यावर आणि काही अटीवर त्याचा जामीन मंजूर करण्यात आला. उस्मानाबाद शहर न सोडण्याचे आणि पीडित फिर्यादी माहिलेवर कोणताही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष दबाव न आणण्याचे बंधन न्यायालयाने जगतापवर घातले आहे.

सेक्समास्टर जगताप याने जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षण विभागातील एका महिला  कर्मचाऱ्यास मोबाईलवरून अश्लील चॅटिंग करून तिला शरीर सुखाची मागणी केली होती. या प्रकरणी जगताप विरुद्ध १६ एप्रिल रोजी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर तो ३७ दिवस फरार होता.अखेर तो मंगळवारी स्वतःहून पोलिसांना शरण आला होता. बुधवारी त्यास न्यायालयात उभे करण्यात आले असता न्यायालयाने तीन दिवसाची म्हणजे २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

तीन दिवसाची पोलीस कोठडी संपताच शनिवारी पुन्हा न्यायालयात उभे करण्यात आले असता, न्यायालयाने काही अटीवर जामीन मंजूर केला.  जगताप यांची  बाजू  विधिज्ञ अॅड. विजयकुमार शिंदे व अॅड. विश्वजित शिंदे यांनी मांडली.

संबंधित बातमी

जगतापला तीन दिवसांची पोलीस कोठडी

Tags :