उस्मानाबाद 0 Comments 241 Likes       28 Jun 2018

मोबाईलचे दुकान चोरट्याने फोडले

उमरगा -  माशाळकर गल्ली  भागातील एका मोबाईल दुकानचे शटर गॅस कटरने तोडून अज्ञात चोरट्यानी दुकानातील १३ लाख ९ हजार ३९१ रुपयांचे मोबाईल हॅण्डसेट लंपास केले.

राहूल राजू येळापूरे यांच्या दुकानावर चोरटयांनी डल्ला मारला. सॅमसंग , ओपो, व्हीवो आदी कंपनीचे हँडसेट चोरटयांनी लंपास केले.आज सकाळी चोरीचा हा प्रकार लक्षात येताच शहरात एकच खळबळ उडाली. 

  या प्रकरणी उमरगा पोलीसात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक माधवराव गुंडिले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल  व्यंकट आडसुळ तपास करीत आहेत . 

 

Tags :