उस्मानाबाद 0 Comments 598 Likes       29 Jun 2018

शिववाहतूक सेनेच्या जिल्हा संघटकपदी अझहर शेख

परंडा - शिवसेना प्रणित शिववाहतूक सेनेच्या उस्मानाबाद जिल्हा संघटकपदी परंडा येथील अझहर शेख यांची निवड झाल्याने माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते त्यांचा  सत्कार करण्यात आला .

या वेळी जनार्धन मेहेर , अब्बास मुजावर , दत्ता मेहेर माजी नगर सेवक विनोद साळवे , मैनुद्दीन तुटके , रईस मुजावर , गुलाम पटेल , रफीक मुजावर तौफीक मुजावर , आसीफ शेख , मुन्ना मोमीन , आलमगीर सय्यद,आदि कार्यकर्ते उपस्थित होते 

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने शिव वाहतूक सेनेचे प्रदेश अध्यक्ष तथा   उप नेते हाजी आरफात शेख यांनी अझहर शेख यांची शिव वाहतूक सेनेच्या  उस्मानाबाद जिल्हा संघटक पदी  नियुक्ती करून मुंबई येथिल शिवसेनेच्या  कार्यालयात यांना नियुक्तीचे पत्र दिले यावेळी हाजी गुलाम पटेल, मुन्ना मोमीन,सादिक शेख ,साबेर मुजावर आदी  उपस्थित होते

 

Tags :