उस्मानाबाद 0 Comments 311 Likes       29 Jun 2018

येथे जोपासली जाते, अंधश्रद्धा...

उमरगा -तालुक्यातील कदेरमध्ये नुकताच कारहुणी सण साजरा करण्यात आला.या सणादिवशी एकीकडे बैलाजोडयांची मिरवणूक काढण्यात येत  असताना दुसरीकडे गावातील राजेंद्र पाटील यांच्या छातीवर दगडी शिळ ठेवून फोडण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. ही श्रध्दा म्हणायची की अंधश्रध्दा,हाच प्रश्‍न उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकांना पडलाय.

तुम्ही पाहू शकता की, कश्याप्रकारे  दगडी शिळ फोेडण्याचे सुरू आहे.राजेंद्र पाटील खाली झोपलाय आणि त्याच्या छाातीवर भला मोठा दगड ठेवून ते फोडण्याचे काम सुरू आहे.दुसरा माणूस हाताड्याने घाव घालून तो दगड फोेडत आहे.विशेेष म्हणजे अनेक घाव घातल्यानंतर तो दगड फुटलाय आणि लोक आनंद व्यक्त करताहेत.जर चुकून घाव दुसरीकडे लागला किंवा दगड लागला आणि त्यात अनर्थ ओढावला तर जबाबदार कोण ? असा प्रश्न चर्चिला जातोय.

राज्यात अंधश्रध्दा निर्मुलन कायदा मंजूर झाला तरी,कदेरमध्ये छातीवर दगड ठेवून ती फोडण्याची अंधश्रध्दा सुरूच आहे.गावातील लोेक त्याला काही लोक त्याला खतपाणी घालत आहेत,हे विशेष.याविरुद्ध नेमका कोण आवाज उठवणार, हे कोडेच आहे.

Tags :