उस्मानाबाद 0 Comments 296 Likes    रोहित गुरव, उमरगा    29 Jun 2018

कदेरमध्ये आगळी वेगळी कारहुनी

उमरगा - खरीप पेरणी हंगाम सुरू होताच  उमरगा तालुक्यातील कदेर गावाला बैल पोळ्याच्या कारहुनवी सणाची चाहुल लागते . या सणादिवशी वर्षभर राबणाऱ्या सर्जा राजाला सजवून पूजा केली जाते . इतकेच काय तर गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. 

 बुधवारीर हा महोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला . गावातील प्रत्येक शेतकऱ्यानी आपल्या बैलजोड्याना सजवून गावातुन  ढोल ,ताशे , बँड , हलगी , डॉलबीच्या गजरात भव्य मिरवणूक काढली.  या महोत्सवात शेकडो देखण्या बैलजोड्यांचा सहभाग होता . सकाळी बैलजोड्यांची पुजा करून बैलाना पुरण पोळी खाव् घालण्यात आली . संपुर्ण गावातील महीलानी बैलजोड्यांची ओवाळणी केली . घराघरांच्या छतावरून महिला वर्गानी या महोत्सवाचा आनंद लुटला . मुरूम , आळंगा , कोथळी , भुसणी , कसगी , औराद , कंटेकूर , आदि सह परिसरातील शेकडो गावाच्या शेतकऱ्यानी आपला सहभाग नोंदविला .  शेतकऱ्यानी डॉलबीच्या विविध गाणांच्या तालावर नृत्याचा ठेका धरला होता . यावेळी मल्लानी चित्तथरारक मलखांबाची प्रात्यक्षिके करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले . राजेंद्र पाटील यांच्या छातीवर दगडी शीळ ठेवून फोडण्याचे चित्तभरारक प्रात्यक्षिक यावेळी लक्षवेधी होते . 

      उमरगा तालुक्यात सद्या खरीप पेरणी हंगाम सुरू झाला आहे . शेतकऱ्यांच्या वतीने शिवारा शिवारात सर्वत्र पेरणी महोत्सव सुरु झाला आहे . शेतकऱ्याना वर्षभर साथ देणाऱ्या मुक्या पशुधनांचा सन्मान व्हावा यासाठी उमरगा तालुक्यातील कदेर येथे बैलांचा राजा सर्जा महोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला . 

 

Tags :