उस्मानाबाद 0 Comments 1712 Likes       29 Jun 2018

संपत्तीच्या वादातून चौघाना जाळले

मृतांत पोलीस कॉन्स्टेबल राहुल देवकते यांचा समावेश

उस्मानाबाद - संपत्तीच्या वादातून मोठ्या भावाने आई,छोटा भाऊ, त्याची पत्नी आणि मुलाच्या अंगावर झोपेत असताना, घरात आणि अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याने त्यात चौघाचा मृत्यू झालाय. बार्शी तालुक्यातील खांडवी गावात  हा प्रकार घडलाय.

मृतांत उस्मानाबादच्या आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल देवकते , त्यांची पत्नी सुषमा, मुलगा आर्यन, आई कस्तुरबा यांचा समावेश आहे.  राहुल आणि त्यांच्या मोठ्या भावात संपत्तीचा वाद होता, त्यातून मोठया भावाने हे चौघे झोपेत असताना त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याने जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्हयात खळबळ उडाली आहे.

 

Tags :