उस्मानाबाद 0 Comments 1186 Likes       29 Jun 2018

मराठा समाजाच्या आंदोलनाच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात

तुळजापूर - मराठा समाजाने यापूर्वी उस्मानाबादसह राज्यभर मूक मोर्चे तसेच विविध आंदोलने करूनहि मराठा समाजाला अद्याप आरक्षण किंवा इतर सोयी सवलती मिळाल्या नाहीत. त्यामुळे मराठा समाजाने पून्हा एकदा रणशिंग फुंकले असून आंदोलनाच्या दुसऱ्या पर्वास तुळजापुरापासून प्रारंभ करण्यात आला आहे.

महाराष्ट्र्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारात जागरण गोंधळ घालून शहरातून  भव्य रॅली काढण्यात आली.  एक मराठा, लाख लाख मराठा असे म्हणत आंदोलकांनी सरकार विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.

तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरात जागरण, गोंधळ घालून रॅलीला  सुरुवात झाली . यावेळी तुळजापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सकल मराठा समाज पुन्हा एकदाआपली ताकद दाखवण्यास सज्ज झाला आहे.

 

Tags :