उस्मानाबाद 0 Comments 1044 Likes       09 Jul 2018

शिला उंबरे यांच्या उपोषणाची सांगता

उस्मानाबाद - उस्मानाबादचे भ्रष्ट आणि मुजोर जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशी करून त्यास  निलंबित करावे, या मागणीसाठी लोकपत्रिका संपादिका सौ.शिला उंबरे- पेंढारकर यांनी लातूरच्या  माहिती उपसंचालक कार्यालयासमोर सोमवारी एक दिवस लाक्षणिक उपोषण केले.

तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराची  ड्रोन कॅमेराने विनापरवाना  शूटिंग केली म्हणून मनोज सानप यांच्यावर तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. त्यापूर्वी जिल्हा माहिती कार्यालयातील एका सहकारी महिलेस त्रास दिला म्हणून आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल होती, सानप यांनी बळीराजा चेतना अभियानमध्ये गैरव्यवहार केला आहे, तसेच दूरदर्शन हे शासकीय माध्यम असताना त्यावर लाखो रूपयाची उधळपट्टी केली आहे. बोगस बिले जोडून स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले आहे.

सानप यांच्याविरुद्ध तक्रारीचा ढीग असताना वरिष्ठ अधिकारी त्यास पाठीशी घालत आहेत. या मुजोर आणि भ्रष्ट अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशी करून त्यास निलंबित करावे, या मागणीसाठी सौ. उंबरे यांनी, लातूरच्या उपसंचालक माहिती कार्यालयासमोर सोमवारी लाक्षणिक उपोषण करून शासनाचे लक्ष वेधले होते.

या उपोषणास लातूरचे माजी आमदार वैजिनाथ शिंदे, मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील, लातूरच्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे, उस्मानाबादचे माजी अध्यक्ष विश्वासआप्पा शिंदे, नगरसेवक खालील सय्यद, राष्ट्रवादीचे गटनेते युवराज नळे,भ्रष्टाचार निर्मूलन संघटेनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर पाठींबा दिला होता.

मनोज सानप यांच्यावर कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सौ. शिला उंबरे- पेंढारकर यांनी दिला आहे.

Tags :