उस्मानाबाद 0 Comments 269 Likes       26 Mar 2017

सुपतगावात दोन गटात हाणामारी

येणेगूर : घराच्या वाटणीची जागा व सामाईक भिंतीवर पत्रे घालण्याच्या कारणावरून भावकितीलच दोन गटात तुंबळ हाणामारी झाली़ ही घटना शुक्रवारी सकाळी उमरगा तालुक्यातील सुपतगाव येथे घडली़ या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून दहा जणांविरूध्द मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू नागप्पा लामजणे व बाळप्पा बसप्पा लामजणे या दोघांमध्ये राहत्या घराचा जागेचा वाद होता. शुक्रवारी सकाळी या दोन्ही भावकितील महिला, नागरिकांमध्ये सामाईक जागा, भितींवर पत्रे घालण्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी झाली़ या प्रकरणात विष्णू बाळाप्पा लोमजणे यांच्या फिर्यादीवरून बाळप्पा बसप्पा लामजणे, नागनाथ बाळप्पा लामजणे, मल्लीनाथ बाळप्पा लामजणे, काशिबाई बाळप्पा लामजणे व स्वरांजली नागनाथ लामजणे या पाच जणांविरूध्द मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तर दुसऱ्या गटातील बाळप्पा बसप्पा लामजणे यांच्या फिर्यादीवरून विष्णू नागप्पा लामजणे, गुंडू नागप्पा लामजणे, नागनाथ गुंडू लामजणे, मिनाबाई विष्णू लामजणे, महादेवी गुंडू लामजणे या पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास पोहेकॉ विजयानंद साखरे, दिगंबर सूर्यवंशी हे करीत आहेत़

 

Tags :