मराठवाडा 0 Comments 745 Likes       29 Mar 2017

आता बुद्धसृष्टीला हवाय समाजातील दानशुरांचा हात

त्रिवेणीताई यांनी होतं-नव्हतं ते सर्व खर्च केलंय; त्याची कदर होणे आवश्यक !

गौतम बचुटे/साळेगाव
सेवा निवृत्ती नंतर मिळालेले  सर्व पैसे हे बुद्दसृष्टी उभारण्यासाठी खर्च केले. आणि आपल्या कुटुंबाची तमा न बाळगता भव्य अशी बुद्ध मुर्ती उभारून बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या वैभवात भर घातली आहे. याचा विचार करून आता या परिसराचा विकास करण्यासाठी आणि ही बुद्धसृष्टी नावारूपाला येण्यासाठी; त्याठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी समाजातील सधन, दानशूर व्यक्ती व समाजसुधारक यांच्या मदतीची गरज आहे.

केज-कळंब राज्य रस्त्यावर अवघ्या हाकेच्या अंतरावर एक ध्येय्य वेड्या त्रिवेणीताई कसबे-पोटभरे यांनी भव्य अशी बुद्ध मुर्ती उभारून बुद्धसृष्टी उभी केली आहे.त्यानी सरकारी सेवेत विविध पदावर काम केलेले आहे. सेवानिवृत्ती पुर्वीच त्यांनी ठरविले की, ज्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या समता बंधुता न्यायाच्या विचासरणीमुळे शिकून नौकरी करण्याची संधी मिळाली आणि त्यामधून समाजसेवा करता आली. त्याची उतराई म्हणून निवृत्ती नंतर मिळालेल्या सेवा निवृत्तीच्या निधीतून आपल्या  स्वतःच्या शेतात राज्यरस्त्या लगतच्या एक एकर जागेत बौद्ध महासभेच्या महाउपासिका मिराताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य अशी वीस फुट उंचीची पंचधातुची बुद्ध मूर्ती उभारली आहे. आणि आता या ठिकाणाला बुद्धसृष्टीला हे नाव शोभुन दिसत आहे.  ठिकाणी विपश्यना केंद्र, भिक्कु निवास आणि बौद्ध धम्मचे अभ्यास केंद्र उभे करायचे आहे परंतु आता त्यासाठीपैशाची अडचण येत आहे. त्रिवेणीताई यांचे हात तोकडे पडत आहेत खुप काही करायची इच्छा आहे पण नाविलाज झालाय. हा परिसर खुप सुंदर आणि नयनरम्य झालेला आहे. या परिसरात महात्मा गौतम बुद्ध यांना बुद्धगयेतील ज्या बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली त्या बोधी वृक्षाच्या फंदीचे कलम लावण्यात आलेले आहे. त्यामुळे या बुद्धसृष्टीला महत्त्व प्राप्त झालेले आहे. आणि त्याचे पावित्र्य वाढले आहे. 

या बुद्धसृष्टीची उर्वतीत विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधी, दानशूर समाज बांधव या सर्वानी आता पुढे येऊन त्रिवेणीताई यांनी केलेले हे धम्माचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यक आहे.

 

आता माझी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आणि त्याला मी कमी पडतेय. मला या ठिकाणी विपश्यना केंद्र, भिक्खू निवास आणि अभ्यासिका व ग्रंथालय उभारायचे आहे. त्यासाठी आर्थिक अडचण

- त्रिवेणीताई कसबे-पोटभरे,
  (बुद्धसृष्टीच्या निर्मात्या)      
 Mob.९७६३६२७१७६

 

त्रिवेणीताई कसबे पोटभरे यांचे कार्य कौतूकास्पद आहे. त्यांना या कामात धावारे ताई यांची देखील मदत होत आहे. तसेच सेवा निवृत्त प्राध्यापक डॉ. शंकर कांबळे हे देखील सहकार्य करतात.

प्रा.संजय कांबळे सर
 (मोहरकर महाविद्यालाय, कळंब)

    

ताई तुमच्या हिमतीला आणि कार्याला त्रिवार अभिवादन !:-

त्रिवेणीताई यांनी राज्यरस्त्यावरची सोन्याच्या मोलाची जमीन आणि पंचधातुची मुर्ती याचा खर्च पहिला तर सुमारे पन्नास लाखाच्याही पुढे आहे. त्यामुळे समाज उन्नतीच्या फुकाच्या थापा मारून वायफळ बडबड करण्यापेक्षा दानशुरांनी पुढे येऊन उर्वरित कामासाठी आर्थिक मदत करावी.                              

- अनिल हजारे (अध्यक्ष, भिमशक्ती उस्मानाबाद जिल्हा)

 

या साठी बौद्ध महासभेच्या वतीने आम्ही देखील धम्म बांधवाना आव्हान करणार आहोत आणि त्या साठी मदत मिळेल अशी खात्री आहे.

 अजय भांगे (अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा  केज)

Tags :
Related Video