मराठवाडा 0 Comments 742 Likes       31 Mar 2017

पन्नास वर्षे वयाच्या शाळेच्या शिपायाने केला सातवीत शिकणाऱ्या तेरा वर्षाच्या मुलीचा विनयभंग !

आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

गौतम बचुटे/साळेगाव

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे एका पन्नास वर्षे वयाच्या शाळेत शिपाई असलेल्या इसमाने सातवीच्या वर्गात शिकत असलेल्या तेरा वर्ष वयाच्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.

साळेगाव पासून जवळच असलेल्या चिंचोली माळी ता. केज येथे खाजगी शाळेत शिपाई म्हणून सेवेत असलेल्या संभाजी तुकाराम कदम वय ५० वर्ष याने त्याच्या घरासमोर राहणाऱ्या आणि इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षणाऱ्या तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. 

दि.२६ मार्च रोजी सकाळी ११:०० वाजता सदर मुलगी ही तिची आई व लहान नऊ महिन्याच्या बहिनी सोबत आपल्या शेतात गेली होती. तिच्या आईने लहान मुलीला खाऊ घालुन दोन्ही मुलींना शेतातील केळीच्या झाडाखाली ठेवून दुसऱ्या शेतात आपल्या दोन पुतण्या सोबत ज्वारी काढायला गेली. त्यावेळी ही तेरा वर्ष वयाची मुलगी तिच्या लहान नऊ महिन्याच्या बहिनी सोबत केळीच्या झाडाखाली झोपली असता दुपारी १:०० वा. संभाजी कदम हा गाय चारण्याच्या बहाण्याने तेथे आला आणि शेजारी मुलीला चिटकून झोपला. त्यानंतर त्याने मुलीच्या अंगावरून हात फिरवून छाती दाबली. तसेच अंतर्वस्त्रात हात घालून फिरवला. त्यामुळे मुलीने भेदरून जाऊन ओरडली पण त्या ठिकाणी आजुबाजूस कोणी नव्हते. त्यानंतर संभाजी कदम याने हा प्रकार कुणाला सांगू नको म्हणून मुलीला धमकी दिली. या प्रकाराने ही अल्पवयीन मुलगी घाबरून गेली आणि घरात एकटी व निराश बसत असल्यामुळे तिच्या आईने याचे कारण विचारले असता तिने दि. ३०मार्च रोजी हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने दि. ३१ मार्च रोजी केज पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून सदर आरोपी शिपाई संभाजी कदम, वय ५० वर्ष रा चिंचोली माळी ता. केज यांचे विरोधात दि.३१ मार्च रोजी  एफ.आय.आर. क्र. ०२१३४  नुसार भां.द.वी. ३५४(अ), ५०६ आणि बाल लैंगिक अपराधा पासून संरक्षण अधिनियम २०१२ चे ७, ८, ९(क) व १० नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. त्या नंतर घटनेचे गांभीर्य ओळखून केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ आरोपीस ताब्यात घेतले असून त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळी हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्या आणि रोटारीच्या अध्यक्षा सिताताई बनसोड व सौ. शरदाताई गुंड यांनी पीडीत मुलीची भेट घेतली आणि पोलीस अधिकाऱ्यास भेटून गुन्हेगारांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.  

Tags :