मराठवाडा 0 Comments 531 Likes       02 Apr 2017

चिंचोली माळीतील 'त्या' घटनेतील आरोपीस न्यायालयीन कोठडी

गौतम बचुटे/साळेगाव

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपीस केज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

चिंचोली माळी ता केज येथे सातवीच्या वर्गात शिकत असलेल्या तेरा वर्षाच्या मुलीचा शेतात एका खाजगी शिक्षण संस्थेत शिपाई असलेल्या संभाजी कदम याने विनयभंग केला  होता. त्याच्यावर केज पोलीस स्टेशनला भां.द.वी. ३५४(अ), ५०६ आणि बाल लैंगिक अपराधा पासून संरक्षण अधिनियम २०१२ चे ७, ८, ९(क) व १० नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्या नुसार पोलिसांनी त्यास अटक करून न्यायालयामोर हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत  करण्यात आली आहे. 
या प्रकरणाचा तपास केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळी करीत आहेत.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्या आणि रोटरीच्या अध्यक्षा सिताताई बनसोड व सौ. शरदाताई गुंड यांनी पीडीत मुलीची भेट घेतली आणि पोलीस अधिकाऱ्यास भेटून गुन्हेगारांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.  

Tags :