मराठवाडा 0 Comments 465 Likes       04 Apr 2017

आपतिग्रस्त कुटुंबाला जनविकासने दिला आधार !

गौतम बचुटे / साळेगाव 

केज तालुक्यातील कर्ज आणि नापीकीला कंटाळुन आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाला आणि नैसर्गिक आपत्तीत  विज पडून दोन्ही बैल दगावलेल्या शेतकरी कुटुंबास जनविकास सामाजिक संस्थेने सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून कुटुंबाला आधार आणि दिलासा देण्यासाठी मदतीचा धनादेश दिला.  

साळेगाव ता. केज येथील शेतकरी चत्रभुज दादाराव वरपे यांनी दि.७ मार्च रोजी बँकेचे कर्ज आणि नापीकीला कंटाळून राहत्या घरातील आडूला गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपविली होती. त्यामुळे हे कुटुंब उघड्यावर पडले होते. त्याकरिता सामाजिक बांधिकीच्या भावनेतून कुटुंबाच्या चरितार्थासाठी व कुटुंबाला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना पिठाची चक्कीचा खरेदीसाठी  जनविकासचे रमेश भिसे यांनी या शेतकरी कुटुंबातील विधवा श्रीमती मंगलबाई वरपे यांना वीस हजार रु.चा मदतीचा धनादेश दिला. या वेळी माजी पंचायत समिती सदस्य हाजी सय्यद नवाब मामु, रामेश्वर शिंदे, ज्योतीराम बचुटे, सुभाष गालफाडे, जय जोगदंड, अक्षय वरपे पत्रकार गौतम बचुते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 

तसेच सातेफळ ता. केज येथे दि.१५ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून आश्रुबा भांगे यांचे दोन्ही बैल दगावले होते. त्यामुळे या कुटुंबाला शेतीसाठी बैल खरेदीसाठी जनविकास सामाजिक संस्थेने त्यांनाही वीस हजार रु.चा धनादेश दिला. या प्रसंगी माजी सरपंच धनराज इंगोले, बाळासाहेब कांदे आणि गावकरी उपस्थित होते. यावेळी रमेश भिसे यांचे सोबत संस्थेचे कार्यकर्ते मच्छिंद्र लांडगे, महादेव जोगदंड, मनीषा घुले, ज्योती सांब्रे हे उपस्थित होते.जनविकास सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश भिसे यांनी दोन्ही कुटुंबाला आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगितले याबद्दल संस्थेचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

आत्महत्याग्रस्त कुटुंबाला ग्रामपंचायतीचाही हात !

छत्रभुज वरपे यांना पिठाची चक्की घेण्यासाठी रमेश भिसे यांनी विस हजार रु.चा धनादेश देताच उपस्थित असलेले साळेगाव ग्रामपंचायतीचे गट प्रमुख हाजी सय्यद नवाब मामु यांनी विज जोडणी कोटेशनसाठी आम्ही मदत करू अशी हमी दिली.

आम्ही तुमच्या सोबत आहोत संकटाने खचू नका
 शेतकऱ्यांनी आत्महत्ये सारखे पाऊल उचलू नये आणि दोन्ही घटना दुर्दैवी आहेत; परंतु संकटाने खचू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत.
---रमेश भिसे,जनविकास सामाजिक संस्था

Tags :