मराठवाडा 0 Comments 728 Likes       22 Apr 2017

चिंचोली माळीच्या एकल बहिणीच्या मदतीला आला कुबडयावर चालणारा अपंग भाऊ !

अभिनेता जितेंद्र जोशी यांनी केला लताताईच्या एकाकी लढाईला सलाम !

गौतम बचुटे/साळेगाव

माझे गाव पाणीदार व्हावे या कामात कुणाची मदत मिळो किंवा न मिळो; पण आपण आपल्या ध्येयापासून परावृत्त न होता आणि उन्हा-तान्हाची तमा न बाळगता श्रमदान करणाऱ्या बहिणीच्या मदतीला एक पाय नसलेला अपंग  भाऊ सरसावला. या दोघा बहिण भावांचे काम हे आभाळाला गवसणी घालणारे आहे. पाणी फाऊंडेशनच्या कामात हे दोघे बहीण भाऊ एक 'आयडॉल' ठरु लागले आहेत.

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील एकल महिला लता बरडे. ही गावात वॉटर कप स्पर्धा सुरु झाल्या पासून कोणी आपल्या सोबत असो किंवा नसो याची तमा न बाळगता एकटीच उन्हा तान्हात राबत आहे. रस्त्याच्या कडेला झाडे लावण्यासाठी खड्डे खोदत आहे. लता ही एकटीच काम करीत असल्याचे तिचा चाळीस वर्षे वयाचा भाऊ सतिश बरडे पहायचा. पण तो तिला मदत करू शकत नव्हता. कारण चार वर्षांपुर्वी डाव्या  पायाला गॅंगरीन झाल्यामुळे मांडीपासूनच पाय कापलेला. तो कुबड्याच्या आघारे कसा तरी दोन पावलं चालण्याचा प्रयत्न करत आहे आणि आयुष्याशी झगडत आहे. त्यामुळे तो नुसतं बहिण एकटीच करीत असलेल काम नुसतं उघड्या डोळ्यांनी पहायचा. बहिणीला मदत करू शकत नाही. म्हणुन दुःखी अंतः करणाने पहायचा. परंतु एके दिवशी सतीशने ठरविले की काही झाले तरी आता मी माझ्या बहिणीच्या सोबत जमेल तेवढ काम करणारच असा त्याने निश्चय केला. त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आणि अंगात आपोआप ताकद निर्माण झाली. सतिशने मग हातात टिकाव घेतला; कुबडया बाजूला ठेवल्या आणि बसून खड्डा खोदायला सुरुवात केली. बहिण लता ही माती भरू लागली. या कामात चि. कृष्णा व कु. अंजली ही सतिशचे दोन्ही मुले सुध्दा आता त्यांना मदत करीत असतात.  लता आणि सतीश काम करीत असलेले पाहुन त्यांची पासष्ट वर्षाची आई देखील भारावून गेली आईने दोघा लेकरांना प्यायला पाणी आणुन देत असते. गाव पाणीदार करण्यासाठी आपली मुलं राबत असलेले बघुन त्या मातेचे डोळे ओले होत आहेत. एखाद्या चित्रपटातल्या कथेसारखा हा भावनिक प्रसंग आहे.  एकल महिला लताताई बरडे आणि तिचा अपंग भाऊ सतिश बरडे यांचा आदर्श धडधाकट असलेल्या गावकऱ्यांनी घेऊन आता गावासाठी योगदान दिले तर गावचा विकास व्हायला वेळ लागणार नाही.

तसेच लताताई कार्याची दखल दैनिक पुण्यनगरीच्या प्रतिनिधींनी घेतली. त्याला ठळक प्रसिद्दी देताच जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्राने दखल घेतली आणि ठळक प्रसिद्दी दिलेली आहे.

 

 

सलाम लताताई तुझ्या कामाला !
पानी फाउंडेशनचे समन्वयक रविकर्ण इंगोले यांनी देताच सिनेअभिनेते जितेंद्र जोशी यांनी लता बरडे यांची भेट घेतली आणि तिच्या कामाचे कौतुक करून भावुक होत लताच्या कार्याला सलाम केला.

 

 

मी हे काम कोणत्या मान सन्मानसाठी करीत नहीं मात्र जितेंद्र जोशी यांनी माझ्या केलेल्या कौतुकने मी भारावून गेले आणि त्यांनी माझे केलेले कौतुक म्हणजे मला स्वप्नवत वाटत आहे.

      ----- लता बरडे,

  चिंचोली माळी ता. केज

Tags :