मराठवाडा 0 Comments 595 Likes       29 Sep 2017

पुरवठा विभागाच्या उपायुक्त वर्षा ठाकूर - घुगे चौकशीच्या फेऱ्यात

www.osmanabadlive.in

उस्मानाबाद - पुरवठा विभागाच्या उपायुक्त ( औरंगाबाद ) वर्षा ठाकूर - घुगे यांनी उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या एका तोतया रेशन दुकानदाराच्या बाजूने निकाल देऊन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचा निर्णय रद्दबातल ठरविला होता, त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवाकडे दाद मागितली असता, मुख्य सचिवानी,पुरवठा विभागाच्या सचिवास चौकशी करून शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूरच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या नावे स्वस्त धान्य दुकान आणि केरोसीनचा परवाना असताना, गावातील दिलीप नामदेव सोलनकर हा व्यक्ती हे दुकान बेकायदेशीर चालवीत होता, याबाबत आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी सन २०१५ मध्ये उस्मानाबादच्या तहसीलदाराकडे तक्रार केली असता, त्यांनी तहसीलच्या पुरवठा अधिकाऱ्यास चौकशी अधिकारी नेमले, त्यांच्या चौकशीमध्ये दिलीप नामदेव सोलनकर याची तोतयागिरी उघडी पडली, त्यानंतर पुरवठा अधिकारी हे ढोकी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यासाठी गेले असता, तत्कालीन सपोनि दिगंबर शिंदे यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. मात्र तहसीलदारांच्या अहवालानुसार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या दुकानाचा परवाना रद्द केला होता.
मात्र तोतया रेशन दुकानदार दिलीप नामदेव सोलनकर हा पुरवठा विभागाच्या उपायुक्त ( औरंगाबाद ) यांच्याकडे अपील दाखल केले. त्यावर उपायुक्त ( औरंगाबाद ) वर्षा ठाकूर - घुगे यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचा निर्णय रद्दबातल ठरविला आणि दुकानाचा परवाना पुन्हा सुरु केला.
दिलीप नामदेव सोलनकर हा दाऊतपूरच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन, सचिव किंवा सदस्य नसताना किंवा कोणत्याही कागद्पत्रांची पडताळणी न करता वर्षा ठाकूर - घुगे यांनी आर्थिक देवाणघेवाण करून हा निर्णय दिला असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केला आणि यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवाकडे दाद मागितली असता त्यांनी पुरवठा विभागाच्या सचिवाना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे उपायुक्त ( औरंगाबाद ) वर्षा ठाकूर - घुगे या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत.

Tags :