महाराष्ट्र 0 Comments 1266 Likes       08 May 2017

मुलींच्या छेडछाडीविरोधात खळखटयाक ,मारमगुप्पी प्रदर्शित

पुणे-  मुलींच्या छेडछाडीविरोधात एकत्रीकरणाने टवाळांना धडा शिकविण्याचा संदेश देणारे मराठी गाणे ' खळखटयाक ,मारमगुप्पी 'महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित झाले आहे . सलाम पुणे या संस्थेच्या वतीने प्रस्तुत केलेले हे गाणे आहे . धग या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचे संगीतकार  आदि रामचंद्र या गीताचे संगीतकार , गीतकार ,गायक आहेत . सलाम पुणे चे अध्यक्ष शरद लोणकर हे निर्माते आहेत . मयूर लोणकर या गाण्याचा नायक आहे तर माधुरी जोशी नायिका आहे .

पुण्यातील एमआयटी महाविद्यालयात चित्रीकरण झालेल्या या गीताच्या चित्रीकरणाचा मुहूर्त महापौर मुक्ता  टिळक आणि नगरसेवक महेश वाबळे यांच्या हस्ते संपन्न झाला होता . माध्यमांमध्ये सिनेमा,टीव्ही ,संगीत ,गाणी हि माध्यमे देखील अत्यंत प्रभावी माध्यमे आहेत आणि अशा माध्यमांतून नेहमीच समाजापुढे समाजाचा आरसा दाखविताना मनोरंजनाच्या नावाखाली कल्पोकल्पित असंख्य बाबी दाखविल्या जातात . पण समाजाला दिशा देणारी कलाकृती देखील हीच  माध्यमे उभी करून एक चळवळ उभी करू शकतात या अनुषंगाने अशा माध्यमांनी महिला सुरक्षितते बाबत गतीने काम करण्याची आवश्यकता आहे आणि याच माध्यमांनी काही अपवाद वगळले तर वेळोवेळी स्त्रीशक्ती चे प्राबल्य देखील वाढविले आहे असे प्रतिपादन यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी केले .

मुलींच्या आणि तमाम महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुढे येणाऱ्या पुरुषांना एकटे न ठेवता त्यांना महिलांनी हि सामूहिकरीत्या बळ देवून टवाळांना धडा शिकविणे गरजेचे आहे . असे सांगणाऱ्या या गाण्यात टवाळांची टोळी गौरव ठिपसे ,विलास शेट्टी , सुशांत जावीर आदी कलाकारांनी उभी केली आहे. या शिवाय रुचिता व्होरा , माधुरी मंडाल, श्रेयाशा शिंदे,समिधा मोहोळ ,सोनी पुजारी आदीच्या यात भूमिका आहेत .

या गाण्याचे छायांकन अजय पंडित यांनी केले असून , संकलन आणि इफेक्ट चे काम मुंबईतील गुरु पाटील यांनी केले आहे .सचिन घोरपडे यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे . व्हिडिओ पैलेस आणि राजश्री मराठी यांच्या वतीने या गाण्याचे प्रदर्शनास मराठी संगीत वाहिन्यांवरून रविवार दि 7 मे पासून प्रारम्भ झाला.

Tags :
Related Video