महाराष्ट्र 0 Comments 2092 Likes       27 Sep 2017

उस्मानाबाद जिल्ह्याला सर्वांत आधी कर्जमाफी!

कोल्हापूर : कर्जमाफीची प्रक्रीया दिवाळीपूर्वी नक्की पूर्ण होईल पण त्या अगोदर बॅंकांनी आपली माहिती देणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी बॅंकाचे काम पूर्ण होईल तिथे पहिल्यांदा कर्जमाफी होईल. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कर्जमाफीची प्रक्रीया सर्वात अगोदर पूर्ण करण्याबाबत आमचे प्रयत्न सुुरु असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री. पाटील म्हणाले, मुदत वाढविल्यास संपूर्ण प्रक्रिया वाढते. यामुळे कर्जमाफी मिळण्यासही विलंब होतो. यामुळे मुदत वाढवायला नको, शिल्लक राहिलेल्यांनाही नंतर याचा लाभ देता येईल या दृष्टीने मी प्रयत्न करीत होतो. परंतू शेतकरी संघटना, व विरोधी पक्षाच्या दबावामुळे आठ दिवस प्रक्रिया लांबली. कर्जमाफीचे सॉफ्टवेअर हे पूर्ण प्रक्रिया झाल्याशिवाय माहिती देवू शकत नाही. 22 ला प्रत्यक्ष प्रक्रिया सुरु झाली. यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळण्यास शेतकऱ्यांना विलंब होत आहे. तरीही आम्ही दिवाळीपूर्वी ही प्रक्रीया पूर्ण करुन शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. उस्मानाबाद येथे मंत्री दिवाकर रावते यांनी याकामी पुढाकार घेतला असून बॅंकानी तातडीने माहिती देण्यासाठी त्यांच्याशी समन्वय साधून माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. यामुळे तो कर्जमाफी मिळणारा पहिला जिल्हा असेल. बॅंकानी तातडीने माहिती द्यावी यासाठी आम्ही बॅंकाकडे माहिती देण्याचा आग्रह करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

Tags :