देश- विदेश 0 Comments 390 Likes       19 Mar 2017

दिग्विजय सिंहांनी राजकारणातून निवृत्त व्हावे- राणे

पणजी - काँग्रेसचे महासचिव व गोव्याचे प्रभारी दिग्विजय सिंह यांनी आता राजकारणातून निवृत्त व्हायला हवे, असा सल्ला गोव्यातील काँग्रेसचे माजी आमदार विश्वजित राणे यांनी दिला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यात अपयश आल्याने राणे यांनी राजीनामा दिला आहे. गोव्याचे प्रभारी असलेल्या दिग्विजय सिंह यांनी सत्ता स्थापनेचा दावा न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. त्यामुळे भाजपने याठिकाणी तीन पक्षांना एकत्र घेऊन सत्ता स्थापन केली असून, मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. राणे म्हणाले, की गोव्यात काँग्रेसने सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी उशीर का केला मला अजून कळले नाही. त्यांच्याकडून तशी कृतीच झाली नाही. काँग्रेसचे नेते माझ्यासोबत असताना आम्ही सरकार स्थापन करू शकलो असतो. गोव्यातील अपयशामुळे दिग्विजय सिंह यांनी आता राजकारण सोडावे.

Tags :